भाजपच्या बंगालमधील रथयात्रेला अखेर कोलकाता उच्च न्यायालयाची अनुमती

रथयात्रेला अनुमती नाकारणार्‍या ममता बॅनर्जी यांना चपराक

  • ममता (बानो) बॅनर्जी यांनी कधी अन्य पंथियांच्या कार्यक्रमांना अशी अनुमती नाकारली होती का ?
  • एरव्ही ऊठसूठ घटनेने दिलेल्या अधिकाराच्या गप्पा मारणारे पुरो(अधो)गामी अशा वेळी कुठे जातात ?
  • हातात बहुमतातील सत्ता असतांना काहीही न करणारा भाजप रथयात्रा काढून काय मोठे दिव्य करणार आहे ? राममंदिरासाठी रथयात्रा काढून आणि सत्ता मिळवूनही भाजपने अद्याप राममंदिर बांधलेले नाही. त्यामुळे अशा यात्रा हिंदूंचे हित साधण्यासाठी नव्हे, तर केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी असतात, हे जनता ओळखून आहे !

कोलकाता – बंगालमध्ये भाजपकडून ‘लोकशाही वाचवा’ या अंंतर्गत काढण्यात येणार्‍या रथयात्रेला कोलकाता उच्च न्यायालयाने अनुमती दिली. त्यामुळे या रथयात्रेला अनुमती नाकारणार्‍या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चपराक बसली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर रथयात्रा काढण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाला असून २२ डिसेंबरला बंगालचा उत्तरेकडील भाग असणार्‍या कूच बिहारपासून या रथयात्रेला आरंभ होणार आहे. बंगाल सरकारने भाजपच्या या रथयात्रेला न्यायालयात विरोध दर्शवतांना ‘गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार या यात्रेमुळे राज्यातील जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता आहे’, असे सांगितले होते.

यावर भाजपचे अधिवक्ता एस्.के. कपूर यांनी जोरदार आक्षेप घेतला. ते म्हणाले, ‘‘या रथयात्रेला अनुमती नाकारणे, हे पूर्वनियोजित होते. त्यामुळे सरकारच्या या आरोपात काहीच तथ्य नाही. इंग्रजांच्या काळातही गांधी यांनी काढलेली दांडी यात्राही कोणी रोखली नव्हती; मात्र बंगाल सरकार भाजपच्या रथयात्रेस विरोध करत आहे. सरकारने राज्यातील जातीय सलोखा बिघडण्याविषयी जे दावे केले आहेत, त्यासंदर्भात कोणतेही वस्तूनिष्ठ तथ्य न्यायालयासमोर ठेवलेले नाहीत. सरकारने रथयात्रेला अनुमती नाकारणे, हे घटनेने दिलेला अधिकार नाकारण्यासारखे आहे.’’ दोन्ही बाजू ऐकून घेत न्यायालयाने या रथयात्रेस अनुमती दिली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now