इगतपुरी येथील उपाहारगृहावर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांना जामीन संमत

नाशिक – इगतपुरी येथील परप्रांतीय उपाहारगृहावर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमण केल्याच्या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना इगतपुरी न्यायालयाने जामीन संमत केला. यातील ६ आरोपींची यापूर्वीच निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

२००८ मध्ये रेल्वेमध्ये परप्रांतीय उमेदवारांना प्राधान्य मिळावे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मुंबईत अटक करण्यात आली होती. त्यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ इगतपुरी येथील एका परप्रांतीय उपाहारगृहावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमण केले होते. याविषयी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या खटल्याची न्या. के.आय. खान यांच्या न्यायालयात सुनावणी चालू होती.

सुनावणीच्या काळात ठाकरे न्यायालयात एकदाही उपस्थित न राहिल्याने अखेर   न्यायालयाने त्यांना उपस्थित रहाण्याची अंतिम संधी दिली होती. या वेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी न्यायालयाच्या परिसरात होती.


Multi Language |Offline reading | PDF