‘हिंदुत्वनिष्ठ’ म्हणवून घेणार्‍या भाजपने हिंदूंचे कोणते प्रश्‍न सोडवले, याचे आत्मचिंतन त्याने करावे !

‘नुकत्याच झालेल्या ३ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठांची अस्वस्थता निश्‍चितच वाढली असणार. प्रत्यक्षात कोणीही निवडून आले, तरी ते या देशाला हिंदु राष्ट्र बनवू शकत नाहीत; कारण प्रत्येक पक्ष राजकीय खेळी खेळत आहेत. परमपूज्य गुरूमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) तसेच अनेक संत यांनी ‘वर्ष २०२३ मध्ये धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच’, असे भविष्य आपल्या दिव्य ज्ञानातून वर्तवले आहे. त्यामुळे भाजप हरली, तरी आम्ही अस्वस्थ झालो नाही; कारण हिंदु राष्ट्र भाजप नाही, तर हिंदु धर्मपरायण साधक आणि संत यांच्या सौजन्याने स्थापन होणार आहे. त्यामुळे ‘कांग्रेस जिंकली, भाजप हरली’, याचा विचार साधना करणार्‍यांनी करू नये. धर्म म्हणजे साक्षात परमात्मा. त्यासाठी, हिंदु राष्ट्रासाठी, राममंदिरासाठी भाजपकडून काहीही प्रयत्न झाले नाहीत. हिंदु धर्म हा देशाचा आत्मा म्हणजे साक्षात परमेश्‍वर आहे. त्यालाच देशाच्या देहातून हद्दपार करण्याचे प्रयत्न सर्वपक्षीय शासनकर्त्यांकडून झाले आहेत. त्यामुळेच देशाची चैतन्यहीन अवस्था झाली आहे. धर्माची पुनर्स्थापना साधू-संत आणि साधक हेच करणार असल्याने ‘भाजप जिंकली काय नी हरली काय ?’, याचे आम्हाला काहीच वाटले नाही. स्वत:ला हिंदुत्वनिष्ठ पक्ष म्हणवून घेणार्‍या भाजपने ‘हिंदूंचे कोणते प्रश्‍न सोडवले’, याचे आत्मचिंतन करावे.’

– सौ. शकुंतला बद्दी, खारघर, नवी मुंबई.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now