दत्तगुरूंची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये

२२ डिसेंबर या दिवशी असलेल्या दत्तजयंतीनिमित्त…

१. दत्तात्रेयांच्या मागील गाय, औदुंबर वृक्ष आणि दत्तात्रेयांच्या समोरील कुत्रे यांचे आध्यात्मिक वैशिष्ट्य

‘दत्ताच्या चित्रात दत्तात्रेयांच्या मागे गाय आणि औदुंबर वृक्ष असतो अन् समोर चार कुत्रे असतात. दत्तपरिवारातील या घटकांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

पहिली विचारसरणी : कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.  (७.१२.२०१८ रात्री ११)

दुसरी विचारसरणी : श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१२.२०१८, सकाळी १०.३६)

कु. मधुरा भोसले

२. त्रिमूर्ती दत्तात्रेयांचे वैशिष्ट्य

दत्तात्रेयांतील ब्रह्मा ज्ञानस्वरूप, विष्णु भक्तीमय आणि शिव ध्यानस्वरूप आहेत. या त्रिदेवांकडून अनुक्रमे ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांची स्पंदने वातावरणात प्रक्षेपित होतात. त्यामुळे या त्रिदेवांचे एकत्रित रूप असणार्‍या दत्तगुरूंचे दर्शन घेतल्यामुळे ज्ञानमार्गी, भक्तीमार्गी आणि ध्यानमार्गी या तिन्ही मार्गांतील, तसेच अन्य मार्गांनी साधना करणार्‍या जिवांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो.

३. दत्तपीठ, ज्ञानपीठ आणि गुरुपीठ

ज्या ठिकाणी दत्तगुरूंचे तत्त्व प्रकट शक्तीसहित घनीभूत झालेले असते, ते स्थान म्हणजे ‘दत्तपीठ’ होय. या पिठाच्या ठिकाणी केलेली साधना लवकर फलद्रूप होते. दत्तपिठातून प्रक्षेपित होणार्‍या दत्ताच्या प्रकट शक्तीमुळे तेथे येणार्‍या जिवांवरील त्रासदायक त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून होऊन त्यांच्यावर पुष्कळ आध्यात्मिक उपाय होतात. या पिठातून प्रक्षेपित होणार्‍या ज्ञानलहरींमुळे जिवाला दैवी ज्ञान आणि आत्मज्ञान यांची प्राप्ती होते. दत्तपिठामध्ये प्रामुख्याने ज्ञानशक्ती कार्यरत असल्यामुळे त्याला ‘ज्ञानपीठही’ म्हणतात. त्याचप्रमाणे दत्तपिठामध्ये गुरुतत्त्व कार्यरत असल्यामुळे या ठिकाणी गुरूंची शक्ती आणि चैतन्य यांची प्रचीती शिष्यांना येते. त्यामुळे दत्तपिठाला ‘गुरुपीठही’ म्हणतात. ‘भक्तीमार्गी भक्त या पिठाला ‘दत्तपीठ’, ज्ञानमार्गी ज्ञानी या पिठाला ‘ज्ञानपीठ’ आणि गुरुकृपायोगानुसार साधना करणारे शिष्य या पिठाला ‘गुरुपीठ’, असे संबोधतात. असे दत्तपीठ कर्नाटकमधील चिक्कमंगळूरू या ठिकाणी आहे. भारतात जेथे दत्ताच्या उपासनेची स्थाने आहेत, ती ठिकाणे दत्तपीठच आहेत.

४. भगवान दत्तात्रेय हे गुरुशिष्य परंपरेचे जनक असणे आणि त्यांनी गुरुकुलाची निर्मिती केली असणे

दत्तगुरूंमुळेच गुरुशिष्य परंपरेचा आरंभ झालेला आहे आणि गुरुकुलाची निर्मिती झालेली आहे. भगवान दत्तात्रेय हे गुरुशिष्य परंपरेचे जनक आहेत. प्राचीन काळी दत्तात्रेयांचा माहूरला आश्रम होता. या ठिकाणी अनेक दत्त भक्तांनी येऊन दत्तात्रेयांच्या सगुण रूपाचे साक्षात दर्शन घेऊन स्वत:चे जीवन कृतार्थ केले आहे. ’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.  (७.१२.२०१८ रात्री ११)

५. दत्तगुरूंच्या शिष्यांनी केलेली नवविधाभक्ती

दत्तगुरूंच्या शिष्यांनी ‘श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन’, या नवविधाभक्ती करून दत्तोपासना केली. याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

– संदर्भ : ‘दत्तमहात्म्य कथामृतसार’, अध्याय पहिला.

कृतज्ञता !

‘हे दत्तात्रेय भगवंता, तुम्ही आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपाने लाभले आहात आणि आम्हा साधकांवर गुरुकृपेचा अखंड वर्षाव करून आमचा क्षणोक्षणी प्रतिपाळ करून आमचा उद्धार करत आहात. यासाठी तुमच्या चरणी कृतज्ञताभावाने आणि समर्पितभावाने नमन करते. ’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१२.२०१८ रात्री ११.१५)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now