शासकीय सेवा भरती पारदर्शकपणे व्हावी ! – मनोहर सोरप, अध्यक्ष, विहिंप

कोल्हापूर, १९ डिसेंबर (वार्ता.) – मराठा, धनगर, लिंगायत आणि अल्पसंख्यांक समाज यांना जाग आल्याने त्यांनी आंदोलनातून सरकारला जागे केले आहे. आता मेगा भरतीद्वारा भरती प्रक्रिया राबवली जाण्याचे संकेत मिळत असून भरतीमध्ये पारदर्शकता ठेवावी, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेचे शहराध्यक्ष श्री. मनोहर सोरप यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. (भरती प्रक्रिया गुणवत्तेनुसार घेतल्यास इतरांमध्ये अन्यायाची भावना रहाणार नाही, हे शासनकर्ते लक्षात घेतील का ? – संपादक)

नुकतीच सैन्य भरतीमध्ये पारदर्शकता पाहून आपल्याला आनंद झाला आहे. याविषयी योग्य ती कार्यवाही व्हावी, असे आवाहन त्यांनी केले.


Multi Language |Offline reading | PDF