आधारकार्डची सक्ती करणार्‍या आस्थापनांना १ कोटी रुपये दंड होणार !

नवी देहली – बँक खाते उघडण्यासाठी, तसेच भ्रमणभाष किंवा दूरभाष जोडणी करण्यासाठी आधारकार्डची सक्ती करणार्‍या आस्थापने आणि बँका यांच्याकडून यापुढे १ कोटी रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. आधारकार्डची माहिती द्यायची कि नाही हे सर्वस्वी सामान्यांच्या इच्छेवर अवलंबून असणार आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आधारकार्डच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निकाल दिला. त्यानंतर केंद्र सरकार आधारकार्ड विषयीच्या कायद्यात दुरुस्ती करणार आहे.

माहिती चोरल्यास ५० लाख रुपये दंड !

आधारकार्डचा वापर करून ग्राहकांची माहिती चोरून त्याचा अपवापर केल्यास ५० लाख रुपये दंड आकारण्यात येईल, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now