संगीत अभ्यासक श्री. प्रदीप चिटणीस यांनी उच्च रक्तदाबाचा त्रास दूर होण्यासाठी गायलेल्या ३ रागांच्या उपयुक्ततेसंबंधी लक्षात आलेली सूत्रे

सूक्ष्म स्तरावरील घडामोडींचे आकलन होण्यासाठी व्यक्तीने स्वतःची साधना वाढवणे आवश्यक !

‘संगीतातील विविध रागांचा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अनुभवण्यासाठी स्वतःची साधना असणे आवश्यक आहे. हा अभ्यास सूक्ष्म स्तरावरील असल्याने सूक्ष्मातील घडामोडी अनुभवण्यासाठी साधनेत प्रगती करणे महत्त्वाचे आहे.

समाजातील साधारण ८० टक्के लोकांना आध्यात्मिक स्वरूपाचा, उदा. वाईट शक्ती, अतृप्त पूर्वज यांचा त्रास असतो. या त्रासामुळे व्यक्तीला सूक्ष्मातील गोष्टी अचूक कळण्यात वाईट शक्तींचा अडथळा येऊ शकतो. त्यामुळे सूक्ष्म स्तरावरील अनुभव येण्यासाठी वाईट शक्तींच्या त्रासाचे प्रमाण न्यून करण्यासह साधनेत प्रगती करणेही महत्त्वाचे आहे.

यासाठी साधनेच्या आरंभीच्या टप्प्याला आपल्या कुलदेवतेचा नामजप, उदा. श्री रेणुकादेवी कुलदेवी असल्यास ‘श्री रेणुकादेव्यै नमः ।’ किंवा कुलदेवता ठाऊक नसल्यास ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ असा नामजप अधिकाधिक करावा. यासमवेत पूर्वजांच्या त्रासापासून रक्षण होण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप दिवसभरात ४५ मिनिटे करावा. याप्रमाणे नामजप केल्याने साधना वाढल्यावर व्यक्तीला सूक्ष्मातील घडामोडींविषयी थोडे थोडे कळायला लागते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘नेहमीची औषधे अधिक करून पृथ्वीतत्त्वाशी संबंधित असतात, तर संगीत पंचमहाभूतांतील सर्वांत सूक्ष्म असलेल्या आकाशतत्त्वाशी संबंधित असल्याने त्याची परिणामकारकता सर्वाधिक असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ

‘श्री. प्रदीप चिटणीस यांनी उच्च रक्तदाबाचा त्रास दूर होण्यासाठी भारतीय शास्त्रीय संगीतातील यमन, गोरखकल्याण आणि जोग हे ३ राग गायले. यांतील प्रत्येक रागाचा उच्च रक्तदाबावर परिणाम होतोच; पण हे तिन्ही राग येथे दिलेल्या क्रमाने ऐकल्याने त्यांचा एकत्रित परिणाम आणखी चांगला होतो. हे राग उच्च रक्तदाबाचा त्रास दूर करण्यासाठी सूक्ष्मातून कसे कार्य करतात, यासंबंधी लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहे.

१. राग यमन

श्री. प्रदीप चिटणीस

१ अ. रागगायन आरंभ होण्यापूर्वी माझी सूर्यनाडी कार्यरत (उजव्या नाकपुडीने श्‍वास चालू) होती.

१ आ. यमन राग प्रथम बुद्धीला शांत करत असणे : यमन राग आरंभ झाल्यावर प्रथम २ – ३ मिनिटे मला त्या रागाची स्पंदने अनाहतचक्रावर जाणवून नंतर ती आज्ञाचक्रावर जाणवू लागली. त्यामुळे मला डोक्यामध्ये थंडावा जाणवू लागला आणि माझे ध्यान लागणे आरंभ होऊन माझी मान खाली झुकू लागली. याचा अर्थ यमन राग प्रथम बुद्धीला शांत करतो.

१ इ. यमन रागाने मनालाही शांत करणे : मला अनाहतचक्रामध्ये थंडावा जाणवू लागला. माझी चंद्रनाडी कार्यरत होऊ लागली. ‘बुद्धीनंतर यमन राग मनाला शांत करतो’, असे जाणवले.

१ ई. यमन रागाने इच्छेचा, म्हणजेच विचारांचा उगम असलेल्या मणिपूरचक्राला थंडावा देऊन अकार्यरत करणे : काही वेळाने यमन रागाची थंड स्पंदने मणिपूरचक्रापर्यंत जाणवू लागली. यमन रागाने इच्छेचा, म्हणजेच विचारांचा उगम असलेल्या चक्राला थंडावा देऊन अकार्यरत केले.

१ उ. सुषुम्ना नाडी कार्यरत होणे : त्यानंतर मला थंड स्पंदने डोक्यामध्ये जाणवू लागली आणि तेव्हा माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

१ ऊ. यमन रागामुळे उच्च रक्तदाब अल्प होण्याचे कारण : यमन रागामधील गायन तार आणि मध्यम सप्तकांतील आहे. त्यामुळे त्यामध्ये शक्ती आहे. त्या शक्तीमुळे शरिराला थोडे जडत्व येते. तसेच यमन रागामुळे मन आणि बुद्धी यांना थंडावाही मिळतो. ‘जडत्व आणि थंडावा यांमुळे उच्च रक्तदाब अल्प होतो’, असे वाटले.

२. राग गोरखकल्याण

२ अ. गोरखकल्याण राग आरंभ झाल्यावर चंद्रनाडी कार्यरत होणे, म्हणजे शरिराला शीतलता मिळणे : गोरखकल्याण राग आरंभ होण्यापूर्वी माझी सूर्यनाडी चालू होती. राग आरंभ झाल्यावर लगेचच चंद्रनाडीला आरंभ झाला. चंद्रनाडी कार्यरत होणे म्हणजे शरिराला शीतलता प्रदान करणे. उच्च रक्तदाब अल्प होण्यासाठी शीतलता महत्त्वाची आहे.

२ आ. अनाहतचक्र आणि विशुद्धचक्र यांच्यामध्ये रागाची स्पंदने जाणवू लागली.

२ इ. गोरखकल्याण राग आरंभ झाल्यापासून ४ – ५ मिनिटांनी माझी सुषुम्ना नाडी आरंभ झाली.

२ ई. रागाची स्पंदने विशुद्धचक्रावर जाणवू लागली.

२ उ. डोक्यामध्ये थंडावा जाणवून बुद्धी शांत होणे आणि श्‍वास थोडा संथ होऊन मन शांत होणे : आणखी ३ – ४ मिनिटांनी मला रागाची स्पंदने डोक्यामध्ये जाणवू लागली आणि तेथे थंडावा जाणवू लागला. तेव्हा श्‍वास थोडा संथ झाला आणि मनाला शांत वाटू लागले.

२ ऊ. मणिपूरचक्रापर्यंत गोरखकल्याण रागाची स्पंदने पोहोचून संपूर्ण शरिरात थंडावा जाणवू लागणे आणि आणखी शांत वाटू लागणे : त्यानंतर गोरखकल्याण रागाची स्पंदने अनाहतचक्रावर पुन्हा जाणवू लागली. तेथे थंडावा जाणवू लागला. पुढे ती स्पंदने मणिपूरचक्रापर्यंत पोहोचून तेथेही थंडावा जाणवू लागला. तेव्हा संपूर्ण शरिराला थंड वाटू लागले आणि आणखी शांत वाटू लागले. शरीर हलके झाले.

२ ए. मान खाली झुकून माझे ध्यान लागू लागले.

३. राग जोग

३ अ. जोग राग आरंभ होऊन ७ मिनिटांनंतर सुषुम्ना नाडी कार्यरत होणे : जोग राग आरंभ होण्यापूर्वी माझी सूर्यनाडी कार्यरत होती. राग आरंभ झाल्यावर माझी चंद्रनाडी कार्यरत होऊन सुषुम्ना नाडी कार्यरत होण्याकडे प्रवास आरंभ झाला. राग आरंभ होऊन ७ मिनिटांनंतर सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

३ आ. जोग रागाने आज्ञाचक्रावर परिणाम करून बुद्धीला शांत केल्याचे जाणवणे : माझ्या आज्ञाचक्रावर स्पंदने जाणवू लागली. ती स्पंदने चक्राकार असल्याचे जाणवले. ‘या रागाने बुद्धीला शांत केले’, असे जाणवले. बुद्धी शांत झाली की, मनही आपोआपच शांत होते. तसे झाले की, उच्च रक्तदाब अल्प होतो.

४. यमन, गोरखकल्याण आणि जोग या रागांच्या परिणामांचा सारांश

४ अ. राग यमन आणि गोरखकल्याण यांमध्ये असलेले समानत्व अन् भेद : राग यमन आणि गोरखकल्याण या दोघांनी प्रथम अनाहतचक्र, त्यानंतर आज्ञाचक्र आणि शेवटी मणिपुरचक्र यांना थंडावा देऊन मन अन् बुद्धी यांना शांत केले. या दोन्ही रागांमध्ये भेद एवढाच की, यमन रागामध्ये शक्तीची, म्हणजे तेजतत्त्वाची स्पंदने अधिक आहेत, तर गोरखकल्याण रागामध्ये वायूतत्त्वाची स्पंदने अधिक आहेत. त्यामुळे गोरखकल्याण राग चालू असतांना शेवटी ध्यान लागले; पण यमन रागाच्या वेळी तसे झाले नाही.

४ आ. जोग रागाने केवळ बुद्धीला शांत केले.

४ इ. सुषुम्ना नाडीचे कार्य : तिन्ही रागांनी सुषुम्ना नाडी कार्यरत केली. सुषुम्ना नाडी चालू असणे म्हणजे डाव्या आणि उजव्या दोन्ही नाकपुड्यांनी समान श्‍वास चालू असणे. सुषुम्ना नाडीमध्ये सर्वच कार्य करण्याची आणि समतोलत्व प्रदान करण्याची क्षमता आहे. त्यामुळे ती कार्यरत झाल्यावर उच्च रक्तदाबावर लगेच नियंत्रण येते.’

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२९.९.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF