सैन्यावर दगडफेक करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्याचे कायद्यात कोणतेही ठोस प्रावधान नाही ! – गृहमंत्रालयाची निलाजरी स्वीकृती

  • हातात सत्ता असतांना भाजप सरकारने गेल्या साडेचार वर्षांत देशद्रोह्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचा कायदा का नाही केला ?
  • ठोस कायदा नाही म्हणून देशद्रोह्यांवर कारवाई करू न शकणारा जगातील एकमेव देश भारत ! आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना हे लज्जास्पद !
  • यावरून कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेत आले, तरी त्यांना राष्ट्रीय सुरक्षेशी काहीएक देणेघेणे नसते, हे सिद्ध होते ! राष्ट्राची ही दुःस्थिती पालटण्यासाठी आता तरी हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

नवी देहली – सैन्यावर दगडफेक करणार्‍यांच्या, तसेच देशविरोधी घोषणा देणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्याचे कायद्यात कोणतेही ठोस प्रावधान नाही, अशी निलाजरी स्वीकृती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली. गृहमंत्रालयाने काश्मीरच्या परिस्थितीविषयी चिंताही व्यक्त केली. ‘झी न्यूज’ वृत्तसंकेतस्थळाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

गृहमंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ‘मागील २ दशकांहून अधिक काळापासून सीमेपलीकडून पुरस्कृत केला जाणारा आतंकवाद आणि फुटीरतावाद यांचा काश्मीरवर मोठा परिणाम झाला आहे. देशविरोधी आणि अवैध कृत्यांत सहभागी लोकांकडून काही स्थानिक नागरिकांनाही चिथवले जात आहे.’ जम्मू-काश्मीरमधील भारतीय सैन्यावर पाकपुरस्कृत आतंकवादी आक्रमणाच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. गृहमंत्रालयाकडून संसदेत सादर करण्यात आलेल्या एका अहवालातील माहितीनुसार वर्ष २०१८ मध्ये सुरक्षादलाच्या सैनिकांवर ५८७ आतंकवादी आक्रमणे झाली आहेत. वर्ष २०१७ मध्ये ही संख्या ३२९ इतकी होती. चालू वर्षात झालेल्या आतंकवादी आक्रमणांत ८६ सैनिक हुतात्मा झाले, तर सैन्याने २३८ आतंकवाद्यांना ठार केले. यांत ३७ नागरिकही ठार झाले आहेत.

घुसखोरीतही वाढ

एका अहवालानुसार वर्ष २०१८ मध्ये आतंकवाद्यांनी २८४ वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये १२८ वेळा आतंकवाद्यांनी देशात घुसखोरी केली. वर्ष २०१७ मध्ये आतंकवाद्यांनी ११३ वेळा घुसखोरी केली होती.

पाक काश्मीरमध्ये निर्माण करत आहे फुटीरतावादी युवकांची संघटना !

पाक काश्मीरमध्ये फुटीरतावादी युवकांची एक नवी संघटना निर्माण करत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. ‘यूथ विंग फॉर फ्रीडम’, असे या फुटीरतावादी देशद्रोही संघटनेचे नाव आहे. विशेष म्हणजे या संघटनेला देहलीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तांकडूनही साहाय्य केले जात आहे. (असे आहे, तर पाकच्या उच्चायुक्तालयातील संबंधितांवर सरकारने काय कारवाई केली ? भारतातील पाकच्या उच्चायुक्तालयातील संबंधितांवर कारवाई करू न शकणारे भाजप सरकार पाकमध्ये घुसून काय कारवाई करणार ? – संपादक) 

(संदर्भ : ‘झी न्यूज’ वृत्तसंकेतस्थळ)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now