(म्हणे) ‘बंदुकीचा वापर हा नक्षलवादाची समस्या रोखण्यावरील उपाय नाही !’ – काँग्रेसशासित छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल

 • विविध घटकांशी चर्चा करून समस्येवर मार्ग काढणार

 • नक्षलग्रस्त भागांतील निमलष्करी दल हटवण्याची एका संघटनेची मागणी

  • अशा काँग्रेसने मानवाधिकाराच्या नावाखाली उद्या नक्षलवाद्यांना मंत्रीमंडळात घेतल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !
  • स्वातंत्र्यापासून आतापर्यंत ७१ वर्षांतील सर्वपक्षीय शासनकर्त्यांच्या बोटचेप्या धोरणामुळे आतंकवाद आणि नक्षलवाद यांचा नायनाट होऊ शकला नाही ! यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • नक्षलवादाच्या विरोधात स्वत: काही करायचे नाही आणि इतरांनाही काही करू द्यायचे नाही, हे काँग्रेसचे धोरण असल्यामुळे आता राज्यात नक्षलवाद फोफावल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !
  • हिंदुत्वनिष्ठांच्या छोट्या-छोट्या कार्यक्रमांमुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येत असल्याची ओरड करत त्यांना नोटिसा बजावणारे भाजप सरकार नक्षलप्रेमी काँग्रेसींमुळे संपूर्ण देशाची सुरक्षा धोक्यात येऊनही कारवाई करत नाही, हे लक्षात घ्या ! असा भाजप म्हणे राष्ट्रभक्त !

रायपूर (छत्तीसगड) – बंदुकीचा वापर करणे, हा नक्षलवादाची समस्या रोखण्यावरील उपाय नाही, असे विधान छत्तीसगडमधील काँग्रेसचे नवनियुक्त मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले. ते येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

बघेल पुढे म्हणाले, ‘‘नक्षलवादी आणि पोलीस दोघेही गोळी चालवतात. दोन्ही बाजूंनी होणार्‍या या गोळीबाराची झळ कोणाला बसत आहे ? आम्ही पीडित आदिवासी, तसेच इतर घटक यांच्याशी चर्चा करून नक्षलवादाच्या समस्येवर उपाय काढू. नक्षलवाद ही कायदा आणि सुव्यवस्थेची नाही, तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समस्या आहे. या सर्व पैलूंचा विचार करून नक्षलवादाच्या समस्येवर उपाय काढण्यात येईल.’’ बघेल यांच्या या विधानानंतर नक्षलग्रस्त बस्तर जिल्ह्यातील तथाकथित मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

नक्षलवादविरोधी कायदा हटवण्याची मागणी

नक्षलवादविरोधी कायदा हटवावा, अशी मागणी छत्तीसगडमधील ‘लोक स्वातंत्र्य संघटन’ (पी.यू.सी.एल्.) या संघटनेचे अध्यक्ष डॉ. लाखन सिंह यांनी नव्या सरकारकडे केली. सिंह यांनी ‘प्रदेशात मानवाधिकार प्रदान करावेत, राजकीय बंदींची मुक्तता करावी, पत्रकार तथा अधिवक्ता यांच्यासाठी संरक्षण कायदा करावा, निमलष्करी दल मागे घ्यावे, नक्षलवाद्यांशी चर्चा करावी, खोट्या चकमकी, तसेच नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण यांची चौकशी करावी’, आदी मागण्याही केल्या.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now