मडगावच्या विद्यमान नगराध्यक्ष डॉ. (सौ.) बबिता आंगले यांच्या विरोधात न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट

सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याचे प्रकरण

फोंडा (गोवा), १९ डिसेंबर (वार्ता.) – ‘सनातन संस्थेच्या प्रचाराविरोधात मडगावात तक्रार दाखल’ या मथळ्याखाली अपकीर्तीकारक वृत्त ३ जुलै २०१२ या दिवशी पान १ वर दैनिक लोकमत आणि मडगावच्या विद्यमान नगराध्यक्ष डॉ. (सौ.) बबिता आंगले यांनी संगनमताने छापले होेते. वास्तविक सनातन संस्थेच्या विरोधात मडगावात कोणतीही पोलीस तक्रार प्रविष्ट झालेली नाही, तरीही खोटी बातमी प्रसिद्ध करून संस्थेची नाहक अपकीर्ती केल्याविषयी दैनिक लोकमत आणि डॉ. (सौ.) बबिता आंगले यांच्या विरोधात सनातन संस्थेने भारतीय दंड संहिता कलम ५००, ५०१ आणि ३४ प्रमाणे फोंडा येथील प्रथमवर्ग न्यायालयात फौजदारी खटला प्रविष्ट केला आहेे. या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी डॉ. (सौ.) बबिता आंगले अनुपस्थित होत्या, तसेच यापूर्वीही सौ. आंगले न्यायालयात अनुपस्थित रहात असल्याचे सनातन संस्थेचे अधिवक्ता श्री. नागेश जोशी-ताकभाते यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर न्यायालयाने १८ डिसेंबर २०१८ या दिवशी सौ. बबिता आंगले यांच्या विरोधात फौजदारी दंड संहितेनुसार अजामीनपात्र वॉरंट काढले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now