‘आयएन्एक्स मीडिया’ घोटाळ्याच्या प्रकरणी ‘ईडी’कडून काँग्रेसचे पी. चिदंबरम् यांना समन्स

भ्रष्टाचारी, खुनी, गुंड, दुराचारी नेत्यांचा भरणा असलेल्या काँग्रेसवर सरकार बंदी का आणत नाही ?

नवी देहली – ‘आयएन्एक्स मीडिया’ घोटाळ्याच्या प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा काँग्रेस नेते पी. चिदंबरम् यांना अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) समन्स पाठवले. ‘ईडी’ने नोव्हेंबर २०१८ मध्ये चिदंबरम् यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र प्रविष्ट केले होते. या आरोपपत्रात त्यांना ‘आरोपी क्रमांक १’ असे म्हटले होते.

चिदंबरम् हे वर्ष २००७ मध्ये अर्थमंत्री असतांना ‘आयएन्एक्स मीडिया’त विदेशी गुंतवणुकीस अनुमती मिळाल्याचे हे प्रकरण आहे. या प्रकरणी सीबीआयने १५ मे या दिवशी गुन्हा नोंदवला होता. ६ जून या दिवशी सीबीआयने चिदंबरम् यांची चौकशी केली होती. त्या वेळी त्यांनी प्रश्‍नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. ‘यामुळे त्यांना अटक करणे आवश्यक आहे’, असा युक्तीवाद सीबीआयने न्यायालयात केला होता. त्यानंतर चिदंबरम् आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम् यांच्या विरोधात खटला चालवण्यास केंद्र सरकारने संमती दिली. त्या वेळी देहलीच्या पतियाळा हाऊस न्यायालयाने पी. चिदंबरम् आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम् या दोघांना दिलेला अंतरिम जामीन १८ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला होता. कालांतराने कार्ती यांना अटक करण्यात आली होती. शीना बोरा हत्याकांडाच्या प्रकरणी सध्या कोठडीत असलेले पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी या दांपत्याने ‘आयएन्एक्स मीडिया’ ही कंपनी चालू केली होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now