३१ डिसेंबरला नववर्ष साजरे करण्याच्या नावाखाली होणारा अनाचार थांबवावा ! – हिंदुत्वनिष्ठांसह अधिवक्त्यांचीही एकमुखी मागणी

वाराणसी येथे हिंदुत्वनिष्ठांकडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

अशी मागणी का करावी लागते ? भाजप सरकार स्वतःहून अशा अपप्रकारांना आळा का घालत नाही ? हे अपप्रकार थांबण्यासाठी नववर्ष ३१ डिसेंबरला नव्हे, तर हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला साजरे करायला हवे. यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे !

अपर जिल्हाधिकारी सतीश पाल यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ३१ डिसेंबरला नववर्ष साजरे करण्याच्या नावाखाली होणारा अनाचार प्रशासनाने थांबवावा, अशी मागणी करणारे निवेदन हिंदुत्वनिष्ठांनी वाराणसीचे अपर जिल्हाधिकारी सतीश पाल यांना दिले. तसेच या निवेदनाच्या प्रती मंडल आयुक्त दीपक अग्रवाल आणि पोलीस अधीक्षक मार्तंड प्रकाश सिंह यांनाही देण्यात आल्या. या वेळी अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, अधिवक्ता अवनीश रॉय, अधिवक्ता अरुणकुमार मौर्या, अधिवक्ता संजीवन यादव, अधिवक्ता अनुप कुमार, अधिवक्ता रतनदीन सिंह, हिंदु युवा शक्तीचे जिल्हा महामंत्री श्री. शुभम मिश्रा आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन केशरी उपस्थित होते.

देशभरात सध्या पाश्‍चात्त्य कुप्रथांच्या वाढत्या अंधानुकरणामुळे नववर्ष गुढीपाडव्याला साजरे न करता ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता साजरे करण्याची कुप्रथा मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. या रात्री धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन आदींचे प्रमाण वाढले आहे. तसेच या रात्री मद्यपान करून भरधाव वेगाने वाहने चालवल्याने अपघातही होत आहेत.

गंभीर बाब म्हणजे या रात्रीपासून मद्य पिण्यास आरंभ करणार्‍यांचे प्रमाण लक्षणीय असून यामध्ये अल्पवयीन मुले आणि महिला यांचाही समावेश आहे. रात्रभर मोठ्या आवाजाचे फटाके उडवून प्रदूषण करणे, तसेच कर्णकर्कश ध्वनीवर्धक लावणे, बीभत्स गाण्यांच्या तालावर अश्‍लील अंगविक्षेप करून नाचणे, शिवीगाळ करणे, मुलींची छेडछाड करणे आदी कुकृृत्ये करून एकूणच कायदा अन् सुव्यवस्था यांच्या दृष्टीने गंभीर स्थिती निर्माण होत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now