हिंदूंकडे प्रत्येकी ५ मुले असली पाहिजेत आणि त्यांना सशस्त्र करायला पाहिजे ! – महंत दिनेश भारती, जम्मू-काश्मीरमधील भाजपचे नेते

केवळ संख्याबळ वाढवून काही साध्य होणार नाही, तर हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांना धर्माचरणी केल्यासच त्यांच्यातील धर्माभिमान जागृत होऊ शकतो !

जम्मू – हिंदूंकडे प्रत्येकी ५ मुले असली पाहिजेत आणि त्यांना सशस्त्र करायला पाहिजे, म्हणजे त्यांच्याकडे कुणी वाकड्या नजरेने बघितले, तर त्यांचे डोळे काढण्याची धमक त्यांच्यात निर्माण केली पाहिजे, असे विधान वर्ष २००८ मधील अमरनाथ आंदोलनाचे प्रमुख महंत दिनेश भारती यांनी केले. जम्मू येथे विश्‍व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या धर्मसभेत ते बोलत होते. अखिल भारतीय संत समितीचे प्रमुख स्वामी जगद्गुरु हंसदेवचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या धर्मसभेला भाजपचे राज्याध्यक्ष रविंदर रैना, माजी मंत्री सत शर्मा, शाम चौधरी आणि चंदर प्रकाश गंगा उपस्थित होते.

महंत भारती पुढे म्हणाले, ‘‘अयोध्येमध्ये एक भव्य राम मंदिर बांधण्यासाठी हिंदूंना पृथ्वीवरील कोणत्याही शक्ती थांबवू शकत नाही.’’

धर्मसभेतील भाषणांविषयी राज्यपाल सतपाल मलिक यांचे सल्लागार के. विजय कुमार यांनी पत्रकारांना सांगितले, ‘‘आम्ही वरील भाषणांचे परीक्षण करत आहोत. आम्ही कायदेशीर मत घेऊ. जर काही अवैध आढळल्यास आवश्यक कारवाई केली जाईल.’’ (हिंदूंनो, मोहरमच्या मिरवणुकांमध्ये नंग्या तलवारी घेऊन नाचणार्‍या धर्मांधांवर कारवाई न करणारे प्रशासन हिंदूंच्या संतांनी केवळ वक्तव्य केले, तरी त्यांच्यावर कारवाई करण्याची भाषा केली जाते, हे लक्षात घ्या !  संपादक)


Multi Language |Offline reading | PDF