मध्यप्रदेशनंतर छत्तीसगडमध्येही काँग्रेसकडून शेतकर्‍यांना कर्जमाफी

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी नुकतेच ‘शेतकर्‍यांना कर्जमाफी देणे हा उपाय नाही’, असे म्हटले आहे ! काँग्रेसवाल्यांना राजन यांच्यापेक्षा अधिक कळते का ?

रायपूर – मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच शेतकर्‍यांना कर्जमाफी दिल्यानंतर काँग्रेसशासित छत्तीसगड सरकारनेही शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. ‘काँग्रेसने शेतकर्‍यांना दिलेले कर्जमाफीचे आश्‍वासन आम्ही पूर्ण करत आहोत’, असे छत्तीसगडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले. बघेल यांनी शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यासह कृषी उत्पादनाला २ सहस्र ५०० रुपये प्रतिक्विंटल किमान हमीभाव देण्याचीही घोषणा केली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now