कुंभपर्वाच्या वेळी रेल्वेप्रवासावर लावला जाणारा अधिभार अखेर रहित !

हिंदु जनजागृती समितीची अनेक वर्षांची मागणी फलद्रूप

  • हिंदूंनो, या यशाविषयी ईश्‍वरचरणी कृतज्ञता व्यक्त करा !
  • कुंभपर्वावर अधिभाराच्या रूपात लावलेला जिझिया कर रहित करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला अनेक वर्षे मागणी करावी लागली, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे ! वास्तविक हिंदूबहुल भारतात हिंदु श्रद्धाळूंवर कर लावलाच कसा जातो ? आता शासनकर्त्यांनी हिंदूंच्या सर्व यात्रा आणि पर्व यांवरील करही रहित करून हिंदूंना समानतेची वागणूक द्यावी, अशी हिंदूंची मागणी आहे !

मुंबई – कुंभपर्वाच्या वेळी आणि हिंदूंच्या अन्य यात्रांच्या वेळी रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेप्रवासावर अधिभार लावला जातो. हा अधिभार प्रत्येक तिकिटामागे ५ ते ४० रुपये एवढा असतो. हा आणि अन्य यात्रांवरील अधिभार केंद्र सरकार रहित करत असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री पियुश गोयल यांनी ट्वीट करून सांगितले. हिंदु जनजागृती समितीने या विषयावर भारतभरात आंदोलने केली होती, तसेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्रालय यांनाही याविषयी अवगत केले होते. त्याचाच हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. आता भाविक नियमित शुल्काची तिकिटे विकत घेऊ शकतात.

आपल्या ट्वीटमध्ये गोयल यांनी सांगितले आहे की, श्रद्धाळूंची धार्मिक श्रद्धा लक्षात घेऊन आणि पर्यटनवृद्धीसाठी केंद्र सरकारने रेल्वेद्वारे वसूल केले जाणारे यात्राशुल्क समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कुंभ आणि अशा सर्व पर्वांवर (मेळ्यांवर) लावल्या जाणार्‍या अधिभारापासून यात्रेकरूंना मुक्तता मिळेल.

हिंदु जनजागृती समितीच्या पाठपुराव्याचे यश ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंना अनेक वर्षांपासून यात्रेवर अधिभार आणि कर भरावा लागत आहे. रेल्वे, बस यांच्या तिकिटांवर हा अधिभार भरावा लागतो. याविषयी आम्ही सातत्याने आवाज उठवला होता. वर्ष २०१३ च्या कुंभपर्वाच्या आणि माघ मेळ्याच्या वेळीही आम्ही आवाज उठवला होता. या वेळी आम्ही उत्तरप्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि रेल्वे मंत्रालय यांना निवेदन दिले होते. त्यांना त्याद्वारे आम्ही सांगितले होते की, असा पक्षपात करू नये. हिंदूंच्या यात्रांना सवलत द्या. पूर्वीचे राजे-महाराजे सवलत द्यायचे. आमच्या मागण्यांचा मान राखत हा अधिभार रहित केला आहे, हे हिंदु जनजागृती समितीने केलेल्या पाठपुराव्याचे यश आहे. केवळ प्रयाग कुंभपर्वामध्येच नव्हे, तर हिंदूंच्या सर्व यात्रा आणि पर्व (मेळे) या वेळी हिंदूंकड़ून वसूल करण्यात येणारा ‘जिझिया कर’ बंद करावा.


Multi Language |Offline reading | PDF