आपल्यापेक्षा शाळकरी मुले बरी ! – लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन

 • लोकसभेत गदारोळ घालणार्‍या सदस्यांची अध्यक्षांकडून कानउघाडणी !

 • गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज पुन्हा स्थगित !

केवळ असे सांगणे नव्हे, तर संबंधितांवर योग्य कारवाई करणे अपेक्षित ! शाळकरी मुलांप्रमाणे वागणारे लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्‍न कधीतरी सोडवू शकतील का ? ही लोकशाहीची निरर्थकताच !

नवी देहली – संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पाचव्या दिवशीही सदस्यांनी विविध सूत्रांवरून गदारोळ घातला. त्यामुळे लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली, तसेच ‘आपल्यापेक्षा शाळेतील मुले बरी’, अशा शब्दांत सदस्यांची कानउघाडणी केली.

सभागृहाचे कामकाज चालू होताच भाजप, काँग्रेस, अण्णाद्रमुक आणि तेलुगू देसम् या पक्षांच्या सदस्यांनी गोंधळ घालणे चालू केले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.

दुपारी १२ वाजता पुन्हा कामकाज चालू झाल्यानंतरही सदस्यांचा गोंधळ कायम होता. काही सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेऊन घोषणाबाजी केली.

या सर्वांना महाजन यांनी वारंवार गोंधळ न घालता शांत बसण्याची सूचना केली. तरीही सदस्यांनी ऐकले नाही. यावर महाजन म्हणाल्या, ‘‘हे लोकसभेचे शेवटचे अधिवेशन आहे. तुमचीही काही महत्त्वाची सूत्रे असतील. संसदेचे अधिवेशन चर्चेसाठी आहे आणि त्यासाठी सरकार सिद्ध आहे. गदारोळ घालण्याची ही पद्धत योग्य नाही. आपल्याकडे विदेशातील शिष्टमंडळे येतात. ‘तुमच्याकडे हे काय चालले आहे’, असा प्रश्‍न ते विचारतात. इतकेच नव्हे, तर ‘आमच्या शाळा फार चांगल्या आहेत’, असा लघुसंदेश शाळकरी मुले पाठवत आहेत. आपण शाळकरी मुलांपेक्षा वाईट आहोत का ? सभागृह जनतेच्या प्रश्‍नांवर चर्चा करायला आहे, गोंधळ घालण्यासाठी नाही. सदस्यांनी दायित्वाने वागले पाहिजे.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now