(म्हणे) ‘बुरहान वानी याला जिवंत पकडून मुख्य प्रवाहात आणायला हवे होते !’ – मेहबूबा मुफ्ती यांचे देशद्रोही विधान

  • गेल्या ७१ वर्षांत शासनकर्त्यांनी आतंकवाद्यांना वेळीच न ठेचल्याने त्यांचे असे समर्थक निर्माण झाले आहेत ! तत्कालीन काँग्रेस सरकारने अशा देशद्रोही राजकारण्यांना रोखण्यासाठी काहीही केले नाही ! आता भाजप सरकारही अशांना मोकळीक देते, हे संतापजनक !
  • जिहादी आतंकवादामुळे विस्थापित झालेल्या साडेचार लाख काश्मिरी हिंदूंविषयी नव्हे, तर जिहादी आतंकवाद्यांसाठी गळे काढणार्‍या जम्मू-काश्मीरमधील धर्मांध राजकारण्यांची धर्मांधता आणि राष्ट्रद्रोही मनोवृत्ती जाणा !
  • सैन्यावर तुटून पडणार्‍या आतंकवाद्यांचे उघड उघड समर्थन करणार्‍यांच्या विरोधात कारवाई न करणारे भाजप सरकार म्हणे राष्ट्रभक्त !
  • अशा आतंकवादप्रेमी मेहबूबा मुफ्तींसोबत भाजप अनेक वर्षे सत्तेत होता, हे लक्षात ठेवा !
  • जगात देशद्रोही कृत्ये करणार्‍यांना फाशी होते, तर भारतात सत्ताप्राप्ती होते ! असे राष्ट्रद्रोही राजकारणी देऊन जगभर देशाची नाचक्की करणारी लोकशाही काय कामाची ? हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

नवी देहली – हिजबुल मुजाहिदीनचा आतंकवादी बुरहान वानी मारला गेला; पण त्याचे (देशद्रोही आणि विखारी) विचार आजही काश्मीर खोर्‍यात जिवंत आहेत. त्यामुळे त्याला जिवंत पकडून मुख्य प्रवाहात आणायला हवे होते, असे विधान जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले. ‘आज तक’ वृत्तवाहिनीच्या ‘अजेंडा आज तक’, या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

मुफ्ती पुढे म्हणाल्या, ‘‘आज ४ मारले, १० मारले, असे बोलून आपण आनंद व्यक्त करतो; परंतु त्यामागील विचार संपवू शकलेलो नाही. आपल्याला असे वाटते की, आतंकवाद्यांना ठार करून समस्या सुटेल; परंतु यामुळे उलट आतंकवादात वाढच होते. जम्मू-काश्मीरमध्ये सहस्रो आतंकवादी मारले गेले; पण अद्यापही आतंकवाद संपलेला नाही. (असे आतंकवादप्रेमी शासनकर्ते असल्यावर आतंकवाद कसा संपेल ? पण आतंकवादी नसलेले निष्पाप काश्मिरी हिंदू मात्र संपले ! – संपादक) बुरहान वानी हा कोणत्याही आक्रमणात सहभागी झाला नव्हता. मी असते, तर त्याला जिवंत पकडले असते.

आतंकवाद्यांना मारून काय मिळते ? (असे आहे, तर मुफ्ती यांनी त्यांच्या लाडक्या आतंकवाद्यांना घेऊन खुशाल पाकमध्ये निघून जावे ! – संपादक) शस्त्रे उचलणार्‍या प्रत्येकाला जिवंत पकडून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (शस्त्रे उचलणार्‍या स्वतःच्या धर्मबांधवांना मुफ्ती का रोखत नाहीत ? – संपादक) असे केल्याने त्यांचा विश्‍वास वाढेल आणि आतंकवादी विचारांचा अंत होईल.’’

(म्हणे) ‘कारगिल आणि संसदेवरील आक्रमण यांनंतरही मुशर्रफ यांच्याशी चर्चा चालू ठेवणे, ही वाजपेयी यांची दूरदृष्टी !’

मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, ‘‘वाजपेयी सरकारच्या काळात कारगिल आणि संसदेवरील आक्रमण यांनंतरही पाकचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांच्याशी चर्चा चालू ठेवणे, ही वाजपेयी यांची दूरदृष्टी होती; कारण त्यांना ‘काश्मीर प्रश्‍न हा गोळीने नव्हे, तर चर्चेने सुटणार आहे’, हे ज्ञात होते. (ही वाजपेयी यांची दूरदृष्टी नव्हे, तर राष्ट्रघात होता ! – संपादक) काश्मीरसाठी वाजपेयींनी जे काम केले, ते जवाहरलाल नेहरूही करू शकले नाहीत. वर्ष २००४ मध्ये जर वाजपेयी यांचेच सरकार सत्तेवर आले असते, तर काश्मीरची समस्या कायमची सुटली असती.’’


Multi Language |Offline reading | PDF