पाकमध्ये सरबजीत सिंह हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींची पुराव्याअभावी सुटका

पाकमध्ये कधीतरी भारतीय नागरिकाच्या हत्येच्या प्रकरणात पाक नागरिकाला शिक्षा होऊ शकते का ? भाजपच्या शासनकर्त्यांना हे उमगेल आणि ते पाकला धडा शिकवण्यासाठी कार्यरत होतील, तो सुदिन !

लाहोर – पाकमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्याच्या खोट्या आरोपांच्या अंतर्गत तेथील कारागृहात खितपत पडलेले भारतीय नागरिक सरबजीत सिंह यांची वर्ष २०१३ मध्ये कारागृहात हत्या झाली होती. या प्रकरणातील २ मुख्य आरोपी अमीर तांबा आणि मुदस्सर यांची पाकिस्तानातील लाहोर सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.

या प्रकरणात गेल्या ५ वर्षांत पाकिस्तान पोलीस दोन्ही आरोपींच्या विरोधात एकही साक्षीदार उभा करू शकले नाहीत. या दोघांनाही त्यांच्या पूर्वीच्या गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या आधीच्या सुनावणीच्या वेळी न्यायाधिशांनी पोलिसांच्या अन्वेषणावर ताशेरे ओढले होते. या दोघांनीही पाकिस्तान उच्चायुक्तांकडे त्यांचा गुन्हा स्वीकारला होता. लाहोर आणि फैसलाबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांचा सूड घेण्यासाठी त्यांनी सरबजीत सिंह यांची हत्या केल्याचे मान्य केले होते.

पाकने खुन्यांना वाचवले ! – सरबजीत सिंह यांच्या बहीण दलबीर सिंह यांचा आरोप

तरणतारण (पंजाब) – मी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्याकडे  मागणी केली होती की, सरबजीत सिंह यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करावेत; मात्र तसे होऊ शकले नाही. कारागृहात षड्यंत्राद्वारे त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर केवळ नाटक म्हणून पाकने कारवाई केली आणि आता आरोपींची सुटका केली, अशी टीका सरबजीत सिंह यांची बहीण दलबीर सिंह यांनी केली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now