अमेरिकेत शासकीय प्रदर्शनात सैतानाच्या शिल्पाचा समावेश

भुताखेतांवर विश्‍वास नसणार्‍या अंनिसला आणि तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

शिकागो – अमेरिकेच्या इलिनॉय राज्याच्या उत्सवी हंगामाला प्रारंभ करतांना शासनाच्या वतीने एक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात भुताखेतांवर विश्‍वास ठेवणार्‍या एका संघटनेने सैतानाची प्रतिमा प्रदर्शित केली आहे. ही प्रतिमा म्हणजे ख्रिसमसचे झाड आणि मेणबत्तीच्या मनोर्‍यामध्ये उभे असलेले सापाने विळखा घातलेल्या हातात एक सफरचंद धारण केलेले चार-फूट उंचीचे शिल्प आहे. हे शिकागो येथील सैतान मंदिराच्या वतीने प्रायोजित करण्यात आले आहे.

शासनाच्या म्हणण्यानुसार, इतर धार्मिक गटांसारखेच सैतानाचेही एक मंदिर आहे. इलिनॉयच्या गृहमंत्र्यांचे प्रवक्ते डेव्ह ड्रकर यांनी ‘अमेरिकेच्या संविधानातील प्रथम दुरुस्तीनुसार लोकांना त्यांच्या भावना आणि त्यांचे विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे’, असे सांगितले. त्यांच्या मते हे शिल्प ते स्वातंत्र्य दर्शवते. शिकागो येथील सामाजिक संघटनांनी सामाजिक संकेतस्थळावर या कृतीविषयी टीका केली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now