श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी पुन्हा रानिल विक्रमसिंघे यांची निवड

कोलंबो – तब्बल ५१ दिवसांच्या सत्तासंघर्षांनंतर श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी पुन्हा ‘युनायटेड नॅशनल पक्षा’चे नेते रानिल विक्रमसिंघे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी विक्रमसिंघे यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. यापूर्वीचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी १५ डिसेंबर या दिवशी पदाचे त्यागपत्र दिल्यानंतर विक्रमसिंघे यांची निवड करून त्यांना लगेच शपथविधीही पार पडला. याच सिरिसेना यांनी यापूर्वी २६ ऑक्टोबर या दिवशी नाट्यमयरित्या विक्रमसिंघे यांना बरखास्त करून राजपक्षे यांना पंतप्रधान बनवले होते.  त्यामुळे श्रीलंकेत घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला होता.


Multi Language |Offline reading | PDF