भूपेश बघेल छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री

रायपूर – छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाविषयी गेल्या ५ दिवसांपासून चालू असलेली निवडप्रक्रिया संपली असून मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या नावावर काँग्रेसने शिक्कामोर्तब केले. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना कसरत करावी लागली. छत्तीसगडचे मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी काँग्रेसच्या ४ जणांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते; मात्र त्यातून गांधी यांनी बघेल यांचीच निवड केली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now