गोमूत्राचा वास हुंगायला दिल्यावर ढेकरा येऊन वाईट शक्तीचा अती तीव्र त्रास लगेच थांबणे आणि आध्यात्मिक त्रास अल्प होणे

‘एका साधिकेला आध्यात्मिक त्रास होत असल्याने मी तिच्यासाठी नामजपादी उपाय सांगत होतो. हे उपाय करू लागल्यावर प्रथम काही वेळ तिचा त्रास अल्प झाला; पण नंतर तो आणखी वाढू लागला. तिला त्रास देणार्‍या वाईट शक्तीने सूक्ष्मातून युद्ध करण्यास आरंभ केला, तसेच तिचा त्रास तीव्र होऊ लागला. माझ्या मनात विचार आला, ‘गोमूत्राचे उपाय करून बघूया.’ त्याप्रमाणे गोमूत्राचे २ थेंब घेऊन हाताला चोळून त्याचा वास त्या साधिकेला हुंगायला सांगितला. तेव्हा तिला ढेकरा आल्या आणि वाईट शक्तीचा अती तीव्र त्रास लगेच थांबला, तसेच त्या साधिकेचा आध्यात्मिक त्रासही पुष्कळ अल्प झाला. वाईट शक्तीच्या कह्यात असलेली ती साधिका त्यातून बाहेर आली. यावरून गोमूत्राची वाईट शक्तीच्या निवारणाची क्षमता आणि महत्त्व लक्षात आले.

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (३.१२.२०१८)

साधकांना सूचना

आध्यात्मिक त्रासाची तीव्रता त्वरित अल्प करण्यासाठी गोमूत्राचा वास घ्या !

गोमूत्रामध्ये पुष्कळ प्रमाणात सात्त्विकता असल्याने ते आध्यात्मिक उपायांसाठी उपयोगात आणले जाते. भूमी किंवा वस्तू यावर गोमूत्र शिंपडल्याने तिच्यातील त्रासदायक शक्तीचे निर्मूलन होते. गोमूत्राचा उपयोग व्यक्तीला होणारा आध्यात्मिक त्रास अल्प करण्यासाठीही करू शकतो. नामजपादी आध्यात्मिक उपाय करत असतांना सूक्ष्मातील युद्धामुळे आध्यात्मिक त्रास आणखी वाढत असल्यास तो त्वरित अल्प करण्यासाठी गोमूत्राचे १ – २ थेंब घेऊन ते तळहातांना चोळून त्यांचा वास घेतल्यास लगेच आध्यात्मिक उपाय होऊन त्रासाचे निराकरण होते. तीव्र त्रास होत असतांना साधकांना त्या त्रासाशी लढता येत नाही. त्या वेळी गोमूत्राचा वास घेण्याचा सोपा उपाय केल्यास त्रासाची तीव्रता लगेच अल्प होते. तीव्र त्रास होत असतांना साधकांना स्वतःला हा उपाय करता येत नसल्यास दुसर्‍यांनी त्यांना गोमूत्राचा वास द्यावा.’

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now