राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य:स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे रविवारचे विशेष सदर : १६.१२.२०१८

१२५ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या नि जगात सर्वांत मोठी लोकशाही म्हणून मिरवणार्‍या भारतीय लोकशाहीचे धिंडवडे निघाले आहेत, असे कोणाला वाटल्यास त्यात वावगे वाटण्यासारखे काही नसावे. याचे कारण असे की, आज प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे. देशाची आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा प्रत्येक क्षेत्रात घसरण चालू आहे. दुसरीकडे बहुसंख्यांक असणार्‍या हिंदूंच्या देशात हिंदूंनाच सापत्नपणाची वागणूक दिली जात आहे. याची असंख्य उदाहरणे देता येतील. ही सर्व परिस्थिती लोकशाहीची निरर्थकताच स्पष्ट करते.

या एकूण परिस्थितीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासम आदर्श नि पितृवत् राज्यकर्त्यांच्या लोककल्याणकारी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय आहे. प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

——-

‘घटनेमुळे राममंदिराच्या उभारणीत अडचणी येत असल्यास घटना पालटू’, असे सांगणारे शासनकर्ते हवेत !

‘राममंदिराच्या संदर्भात लवकरच निर्णय लागेल आणि घटनेच्या चौकटीत राहून राममंदिर उभारले जाईल !’

– योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश.

——————-

‘सनातन हिंदु धर्माची स्थापना होऊन ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होणे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. माझे या कार्याला सदैव शुभाशीर्वाद आहेत ! – ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते, धर्माचार्य शड्दर्शनाचार्य भीष्माचार्य वेदशास्त्रसंपन्न वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू, पंढरपूर.

——————-

‘धर्म नाही, तर काही नाही. धर्म नाही, तर जीवन संपल्यासारखे आहे !’ – प.पू. स्वामी कृष्णानंद सरस्वती, राष्ट्रीय अध्यक्ष, श्री रामदास मिशनचे (युनिव्हर्सल सोसायटी), बदलापूर, ठाणे.

——————–

प्रदूषण नियंत्रण मंडळाने फटाक्यांमुळे होणार्‍या प्रदूषणाविषयी उपाययोजना काढण्याऐवजी सर्वोच्च न्यायालयाला वेळा सांगाव्या लागणे, हे प्रदूषण नियंत्रण मंडळाला लज्जास्पद ! सरकारचे एकतरी खाते सक्षम आहे का ?

‘पणजी (गोवा) शहरात फटाके फोडल्याने होणार्‍या ‘ध्वनी प्रदूषणा’वर देखरेख ठेवण्यासाठी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने ५ नोव्हेंबर २०१८ या दिवशी एका समितीची स्थापना केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरण खात्याने राज्यात फटाके फोडण्यासाठी वेळा निश्‍चित केल्या आहेत. पर्यावरण खात्याच्या या आदेशानंतर गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणावर देखरेख ठेवण्यासाठी समिती स्थापन केली आहे.’

———————

मानवांची हृदये जोडून नव्हे, तर तलवारींच्या बळावर रक्तपात करून पोसला गेलेला ख्रिस्ती पंथ !

‘रोमन साम्राज्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर राज्यकर्त्यांच्या हातात हात घालून संगनमताने हा धर्म चालू लागला. दुर्दैवाने जो धर्म मानवांची हृदये जोडून पुढे जायला हवा होता, तो तलवारींच्या आधाराने रक्तपात करत जगात पसरू लागला.’


Multi Language |Offline reading | PDF