ब्रिटनच्या पंतप्रधानांनी विश्‍वासदर्शक ठराव जिंकला !

लंडन – ब्रेग्झिट करारावरून अडचणीत सापडलेल्या ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी शेवटी विश्‍वासदर्शक ठराव जिंकला. ब्रेग्झिट करारानंतर हुजूर पक्षाच्या खासदारांनीच थेरेसा मे यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव मांडला होता. हा अविश्‍वास ठराव फेटाळण्यासाठी मे यांना पक्षाच्या ३१५ पैकी १५८ खासदारांची मते आवश्यक होती. मे यांना एकूण २०० मते मिळाली. हुजूरपक्षाच्या ६३ टक्के खासदारांनी मे यांच्या बाजूने, तर ३७ टक्के खासदारांनी त्यांच्या विरोधात मतदान केले. मे यांचा पराभव झाला असता, तर ब्रेग्झिट करारावरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असते. त्यामुळे या ठरावाकडे जगभराचे लक्ष लागले होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now