रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तीकांत दास यांची निवड चुकीची ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

डॉ. स्वामी यांच्यासारखे राष्ट्रनिष्ठ नेते स्वपक्षाच्या निर्णयावर टीका करतात, त्या वेळी त्यात तथ्य असते; मात्र भाजप सरकार त्याकडे दुर्लक्ष करते. यावरून राष्ट्रनिष्ठ आणि तत्त्वनिष्ठ नेत्यांचे भाजपमध्ये काय स्थान आहे, हेच यातून लक्षात येते !

नवी देहली – भाजप सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी शक्तीकांत दास यांची निवड केली आहे. या निवडीवर भाजपचेच वरिष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी आक्षेप घेतला. ‘शक्तीकांत दास यांची गव्हर्नरपदी निवड अत्यंत चुकीची आहे.

दास हे काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीयमंत्री पी. चिदंबरम् यांच्यासारख्या भ्रष्टाचारी नेत्याचे निकटवर्तीय आहेत. ‘चिदंबरम् यांना न्यायालयीन खटल्यातून वाचवण्यासाठी दास यांनी प्रयत्न केले आहेत’, असे आरोप डॉ. स्वामी यांनी केला आहे. दास यांची या पदी निवड का करण्यात आली, हेच मला समजलेले नाही. मी याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ‘माझा या निवडीला विरोध आहे, असे कळवणार आहे’, असे डॉ. स्वामी यांनी सांगितले. दास यांनी १२ डिसेंबरला सकाळी गव्हर्नरपदाची धुरा हाती घेतली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही दास यांच्या निवडीवर टीका केली. ‘दास हे अर्थतज्ञ नसून नोकरशाह आहेत. त्यांनी नोटाबंदीचे समर्थन केले आहे. आता सरकार जे सांगेल ते ऐकण्याचे काम दास करतील. आणखी एका संस्थेचे अस्तित्व संपुष्टात येणार’, अशी टीका सिब्बल यांनी ट्वीट करून केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF