सनातनचे संत पू. नीलेश सिंगबाळ यांनी घेतली वाराणसी येथे प.पू. ब्रजनंदनजी महाराज यांची सदिच्छा भेट

डावीकडून श्री. राजन केसरी, मध्यभागी प.पू. ब्रजनंदनजी महाराज यांना ‘सनातन पंचांग’ भेट देतांना पू. नीलेश सिंगबाळ

वाराणसी – सनातन संस्थेचे पूर्वोत्तर भारताचे धर्मप्रसारसेवक पू. नीलेश सिंगबाळ यांनी येथील देवाश्रम ट्रस्टचे संस्थापक प.पू. ब्रजनंदनजी महाराज यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. या भेटीत पू. सिंगबाळ यांनी महाराजांना महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. त्यांना सनातनच्या गोव्यातील आश्रमाला भेट देण्याविषयी निमंत्रित केले. सनातन संस्थेचे कार्य समजून घेतल्यानंतर त्यांनी ‘मी या कार्यात काय साहाय्य करू शकतो’, याविषयी विचारले. तीर्थराज प्रयाग येथे येत्या जानेवारीमध्ये होणार्‍या कुंभपर्वात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने राबवण्यात येणार्‍या उपक्रमाविषयी त्यांना माहिती देण्यात आली आणि तेथील प्रदर्शनाला भेट देण्याविषयी विनंती करण्यात आली. तसेच ‘गोवा भेटीवर गेल्यास आश्रमाला अवश्य भेट देईन आणि कुंभमेळ्यात प्रदर्शन पहाण्यासाठी येईन’, असे सांगितले. या भेटीच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे वाराणसीचे समन्वयक श्री. राजन केसरी आणि सनातनचे प्रवक्ते श्री. शंभू गवारे उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF