या देशाला रामराज्याची आवश्यकता आहे ! – राज ठाकरे

मुंबई – भाजपला ‘होमग्राऊंड’मध्ये जागा दाखवणारे गुजरात हे पहिले राज्य होते. त्या निवडणुकीत झालेले मतदान आणि आता झालेल्या मतदान यांवरून भाजपला त्यांची जागा समजली आहे. या देशाला रामराज्याची आवश्यकता आहे, राम मंदिराची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकीविषयी व्यक्त केले.

उर्जित पटेल यांनी कुठल्या तरी मोठ्या धोक्याच्या आधी त्यागपत्र दिले आहे. पांडुरंग फुंडकर गेल्यापासून राज्याला कृषीमंत्री नाहीत. शेती आणि दुष्काळ यांचे गांभीर्य पाहून वेगळा कृषीमंत्री हवा आहे; मात्र या सरकाराला काही देणे-घेणे नाही. त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवला, असे ते पुढे म्हणाले.


Multi Language |Offline reading | PDF