कराड येथील गोरक्षण आरक्षण कायम ठेवण्यासाठी नगरपालिका आणि प्रांत कार्यालय येथे गोप्रेमींकडून निवेदन 

२५० गोप्रेमींची निवेदनावर स्वाक्षरी, तर निवेदन देण्यासाठी ५० हून अधिक गोप्रेमी उपस्थित !

नगराध्यक्षा १. सौ. रोहिणी शिंदे यांना निवेदन देतांना गोप्रेमी

कराड, ११ डिसेंबर (वार्ता.) –  विद्यमान सरकारच्या काळात महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असून गोपालनासाठी प्रोत्साहनपर योजना चालू आहे. अशा वेळी कराड शहरातील मध्यवस्तीत ११० वर्षांहून अधिक काळ असलेल्या गोरक्षण केंद्रात गायींच्या व्यवस्थेची झालेली दुरवस्थेविषयी प्रशासनाने शासकीय स्तरावर योग्य ती कृती करून गोरक्षणाचे आरक्षण कायमस्वरूपी ठेवण्यासाठी प्रशासनास ‘गोरक्षण बचाव समिती’च्या वतीने १० डिसेंबर या दिवशी निवेदन देण्यात आले. २५० हून अधिक गोप्रेमींच्या स्वाक्षर्‍या असलेले निवेदन माननीय प्रांताधिकारी श्री. हिंमत खराडे, तहसीलदार श्री. राजेश चव्हाण, नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी श्री. यशवंत डांगे यांचे कार्यालय निरीक्षक श्री. गोसावी यांना हे निवेदन देण्यात आले.

या वेळी भाजप नगरसेवक श्री. सुहास जगताप, भाजप नगरसेविका सौ. अंजली कुंभार, हिंदू एकता आंदोलनाचे श्री. रूपेश मुळे, शिवसेनेचे श्री. प्रमोद तोडकर, भाजप युवा मोर्चाचे श्री. प्रशांतसिंह तवर, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. सागर आमले, गोरक्षण बचाव समितीचे श्री. सुनील पावसकर, गोरक्षण व्यवस्थापक श्रीमती गीता सूर्यवंशी (यादव), हिंदु जनजागृती समितीचे श्री. मदन सावंत, सनातन संस्थेचे श्री. सुरेंद्र भस्मे यांसह ५० पेक्षा अधिक गोप्रेमी उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. निवेदनाच्या प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मदन सावंत आणि उपस्थित महिला यांच्या हस्ते गोरक्षणाच्या केंद्रातील गायींचे पूजन करण्यात आले.

२. नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांनी ‘या प्रकरणी पुढील निर्णय घेण्यासाठी लवकरच बैठक घेऊन गोरक्षण बचाव समितीस सहकार्य करू’, असे आश्‍वासन गोप्रेमींना दिले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now