दुर्गापूर (बंगाल) येथे भाजपच्या नेत्याची हत्या

तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर संशय

  • स्वपक्षाच्या नेत्यांच्या एकामागोमाग एक होणार्‍या हत्या रोखू न शकणारे भाजप सरकार कधी हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या रोखू शकेल का ? हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • बलात्कार, हत्या, देशद्रोह आदी कुकृत्ये ‘पक्षकार्य’ असल्याप्रमाणे नित्य करणार्‍या कार्यकर्त्यांचा भरणा असलेल्या तृणमूल काँग्रेसवर भाजप सरकार बंदी का घालत नाही ?

कोलकाता – दुर्गापूर जिल्ह्यातील कांसा सरस्वतीगंज येथील भाजपचे नेते संदीप घोष यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. ही हत्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचा संशय आहे. या आक्रमणात जयदीप बॅनर्जी नावाची एक व्यक्ती घायाळ झाली असून तिला जवळच्या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. घोष हे सरस्वतीगंज मोड येथील बूथ समितीची बैठक आटोपून निघाले होते. वाटेत त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. ‘या प्रकरणी सीबीआयने चौकशी करावी’, अशी मागणी भाजपचे दुर्गापूर जिल्हाध्यक्ष लखन घरूई यांनी केली.

६ डिसेंबरला झाले होते वाहनावर आक्रमण

६ डिसेंबर या दिवशी कूचबिहार जिल्ह्यातील सीतलकुची भागात अज्ञातांनी संदीप घोष यांच्या वाहनावर आक्रमण केले होते. ते भाजपच्या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी कूचबिहार येथे गेले होते. यावर संदीप घोष यांनी, ‘तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी माझ्या वाहनावर आक्रमण केले आणि मला ओरडून परत जाण्यास सांगितले.

या वेळी झालेल्या झटापटीत भाजपचे काही कार्यकर्ते घायाळ झाले. हे सर्व चालू असतांना पोलिसांनी मात्र केवळ बघ्याची भूमिका घेतली’, असे वक्तव्य केलेे होते. तृणमूल काँग्रेसचे नेते रवींद्रनाथ घोष यांनी घोष यांचे आरोप फेटाळून लावले होते. या घटनेच्या ३ दिवसांनंतरच घोष यांची हत्या करण्यात आली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now