आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचे त्यागपत्र

नवी देहली – रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी १० डिसेंबर या दिवशी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले. ‘मी वैयक्तिक कारणांमुळे माझ्या पदाचे त्यागपत्र देत आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यातील मतभेदाच्या पार्श्‍वभूमीवर पटेल यांनी तडकाफडकी त्यागपत्र दिल्याने अनेकांकडून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. ‘मी अनेक वर्षांपासून रिझर्व्ह बँकेत काम करत असून माझ्यासाठी ही कायमच अभिमानास्पद गोष्ट आहे’, अशी प्रतिक्रियाही उर्जित पटेल यांनी या वेळी व्यक्त केली.


Multi Language |Offline reading | PDF