बुलंदशहरमधील घटना हा अपघात ! – योगी आदित्यनाथ

गोहत्येवरून बुलंदशहर (उत्तरप्रदेश) जिल्ह्यातील हिंसाचाराचे प्रकरण

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – येथे जमावाकडून मारहाण झाल्याचे प्रकरण हा एक अपघात होता. या प्रकरणी कायद्यानुसार कारवाई चालू असून दोषींना सोडले जाणार नाही, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले. गोहत्येवर संपूर्ण उत्तरप्रदेश राज्यात बंदी आहे. त्यामुळे गोहत्या झाल्याच्या प्रकरणी अधिकारी उत्तरदायी असतील, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. या हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांच्यासह एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.

पोलीस निरीक्षक सिंह यांचा मृत्यू सैनिकाच्या गोळीबारात ?

हिंसाचाराच्या वेळी पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह, तसेच सुमितकुमार या युवकाचा मृत्यू हा सैनिकाने केलेल्या गोळीबारात झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे जितू नावाच्या सैनिकाला पोलिसांनी कह्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. बुलंदशहर हिंसाचाराच्या काही ‘व्हिडिओ क्लिप’ पोलिसांच्या हाती लागल्या होत्या. त्यात एक सैनिक गोळीबार करत असल्याचे पोलिसांना दिसून आले. या सैनिकाचे नाव जितू असून त्यांचा एफ्.आय.आर्.मध्ये उल्लेखही आहे. हा सैनिक मूळचा बुलंदशहर जिल्ह्यातील रहिवासी आहे.

 

 


Multi Language |Offline reading | PDF