सोलापूर येथे अवैध पशूवधगृहाविषयी बातमी प्रसारित केल्याच्या कारणावरून धर्मांधांचे पत्रकारावर प्राणघातक आक्रमण

  • गोवंशहत्याबंदी कायदा करूनही महाराष्ट्रात गायींच्या हत्या थांबलेल्या नाहीत ! कारण कायद्याची कार्यवाही चांगल्या प्रकारे होत नाही. परिणामी गोरक्षकांना आक्रमणांचा सामना करावा लागत आहे !
  • आता अवैध पशूवधगृह आणि गोवंशहत्या यांची बातमी देणार्‍या पत्रकारांवर आक्रमणे होणे, हे धर्मांधांचा जोर वाढल्याचे लक्षण आहे. या पार्श्‍वभूमीवर शासनकर्ते कठोर धोरण अवलंबणार कि नाही ?

सोलापूर – येथील विजापूरवेस परिसरात अवैध पशूवधगृह आणि त्यात होणार्‍या गोवंशहत्येविषयी बातमी प्रसारित केल्याच्या कारणावरून वृत्तवाहिनीचे पत्रकार श्री. विजयकुमार रामचंद्र बाबर यांच्यावर कसायांच्या जमावाने प्राणघातक आक्रमण केले, तसेच त्यांच्या समवेत असलेले सामाजिक कार्यकर्ते जावीद शेख हेही गंभीर घायाळ झाले आहेत. दोघांनाही उपचारासाठी शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

या घटनेची तक्रार घायाळ जावीद शेख यांनी जेलरोड पोलिसांत केली. त्यानंतर पोलिसांनी बिलाल कुरेशी, जफर कुरेशी, इजहार कुरेशी, इम्तियाज कुरेशी, मुदस्सर कुरेशी, जिलानी कुरेशी यांच्यासह २१ जणांवर अवैध जमाव जमवून हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला. त्यातील बिला कुरेशी आणि जफर कुरेशी या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कुरेशी गल्ली येथे गोवंशियांची अवैध कत्तल केली जात असून, परिसरात दुर्गंधी पसरत असल्याची मुलाखत जावीद शेख यांनी वृत्तवाहिनीला दिली होती. ती बातमी प्रसारित झाल्यावर पोलिसांनी या परिसरात कत्तलीसाठी आणलेले गोवंश कह्यात घेऊन संबंधितांवर गुन्हे नोंद केले होते.

पत्रकारावरील आक्रमणातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी !

अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन

सोलापूर, ९ डिसेंबर (वार्ता.) – कसायांचा उद्दामपणा आणि गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या आक्रमणातील संबंधित गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून अवैध पशूवधगृहे आणि मांस विक्रीची दुकाने यांच्या मालकांवर तातडीने कारवाई करावी, या मागणीचे निवेदन अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने पोलीस आयुक्त कार्यालयात देण्यात आले. पोलीस उपायुक्त श्री. गायकवाड यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी बजरंग दलाचे श्री. अंबादास गोरंटला, अखिल भारतीय हिंदू महासभेचे श्री. सुधीर बहिरवाडे, श्री. विजय यादव, भाजप युवा मोर्चाचे श्री. संदीप जाधव, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. रवि गोणे, गोरक्षक श्री. विजय कुलथे, सर्वश्री विवेक इंगळे, विनायक पाटील, उदय वैद्य, अविनाश हजारे, अमित परदेशी, किरण पंगुडवाले यांसह अनेक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की,

१. मागील काही मासांपासून सोलापूर शहरात अवैध पशूवधगृहे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत.

२. गोवंशहत्याबंदी होऊनही सोलापूर येथे मोठ्या प्रमाणात गोवंशांची हत्या होते. याविषयी हिंदु महासभेच्या वतीने अनेक वेळा पोलिसांकडे लेखी तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.


Multi Language |Offline reading | PDF