केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिराच्या मिरवणुकीला वाट मोकळी करून देण्यासाठी थिरुवनंतपूरम् विमानतळ काही घंट्यांसाठी बंद

हिंदूंच्या उत्सवातील परंपरेचे जतन करण्याची थिरुवनंतपूरम् विमानतळ अधिकार्‍यांची स्तुत्य कृती !

कोची – श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या प्राचीन विधीचा आदर करत थिरुवनंतपूरम् विमानतळ अधिकार्‍यांनी देवतेच्या पालखी मिरवणुकीला वाट मोकळी करून देण्यासाठी विमानतळावरील विमानांची उड्डाणे नुकतीच काही घंट्यांसाठी बंद ठेवली. वर्षातून २ वेळा श्री पद्मनाभस्वामी देवतेला पालखीतून ‘शाही स्नाना’साठी शंखुमुखम् किनारपट्टीवर नेले जाते. श्री पद्मनाभस्वामी उत्सवातील हा एक महत्त्वाचा पारंपरिक विधी आहे. त्रावणकोर राजघराण्याचा शेवटचा राजा थिरुनल बाला रामा वर्मा यांच्या राजवटीपासून हा विधी चालू आहे. देवतेची गरुड वाहनावरून मिरवणूक निघते. कालांतराने त्या वाटेवर विमानतळाची धावपट्टी उभारली गेली. तेव्हापासून या उत्सवाच्या वेळी विमानतळाचे कामकाज काही घंट्यांसाठी बंद ठेवण्यात येते.


Multi Language |Offline reading | PDF