भाजपच्या ‘लोकशाही वाचवा रथयात्रे’ला कोलकाता उच्च न्यायालयाने अनुमती नाकारली

कोलकाता – भाजपच्या ‘लोकशाही वाचवा रथयात्रे’ला कोलकाता उच्च न्यायालयाने अनुमती नाकारली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जानेवारीला होणार आहे. भाजपची बाजू मांडणारे अधिवक्ता अनिंद्या मित्रा यांनी न्यायाधीश तपब्रत चक्रवर्ती यांच्या पिठासमोर सांगितले की, भाजपने बंगालचे पोलीस महासंचालक, तसेच गृहसचिव यांना या रथयात्रेला अनुमती देण्याची मागणी करणारी अनेक पत्रे पाठवली; मात्र त्यांपैकी एकाही पत्राला उत्तर देण्यात आले नाही. बंगाल सरकारच्या बाजूने महाअधिवक्ता किशोर दत्ता यांनी बाजू मांडली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now