गंगेच्या स्वच्छतेसाठी आमरण उपोषण करणारे संत गोपाल दास महाराज अचानक बेपत्ता !

रुग्णालयात चालू होते उपचार

  • ‘वेळीच गंगानदीची स्वच्छता न करणारे भाजप सरकारच यास उत्तरदायी आहे’, असे कोणी म्हटल्यास चूक ते काय ?
  • संतांचे बेपत्ता होणे, हे भाजप सरकारला लज्जास्पद ! सरकारने संत गोपाल दास महाराजांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केले, तसे अन्य पंथीय धर्मगुरूंच्या संदर्भात करण्याचे धाडस केले असते का ?
  • हिंदूंनो, उपोषण करून तुमच्या समस्या सुटणार नाहीत; कारण उपोषणाची भाषा सरकारला कळत नाही. हे लक्षात घेऊन संघटित व्हा !

डेहराडून (उत्तराखंड) – गंगानदीच्या स्वच्छतेसाठी आमरण उपोषण करणारे संत गोपाल दास महाराज अचानक बेपत्ता झाले आहेत. २४ जूनपासून त्यांनी उपोषणाला आरंभ केला होता. भाजपशासित उत्तराखंडमधील डेहराडून येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. रुग्णालयातून ते बेपत्ता झाले आहेत. पोलीस अद्याप त्यांचा शोध लावू शकलेले नाहीत.

डेहराडून पोलिसांनी, ‘संत गोपाल दास महाराज यांना ४ डिसेंबरला देहलीतील ‘एम्स्’ रुग्णालयातून सोडण्यात आले होते. यानंतर त्यांच्या एका सहकार्‍याने त्यांना डेहराडून येथील दून रुग्णालयात भरती केले होते’, अशी माहिती दिली.

याविषयी या रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक के.के. टामटा म्हणाले, ‘‘४ डिसेंबरला मध्यरात्री एका व्यक्तीने संत गोपाल दास महाराज यांना रुग्णालयात भरती केले होते. त्या व्यक्तीने स्वतः दास यांचे सहकारी असल्याचे सांगितले होते. ५ डिसेंबरला सायंकाळी मी रुग्णालयातून निघालो. त्यानंतर रात्री ८.३० वाजता रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी महाराज बेपत्ता असल्याची माहिती मला दिली.’’

पोलीस उपायुक्त विजय कुमार यांनी ‘आम्हाला संत गोपाल दास महाराज यांच्या वडिलांकडून तक्रार मिळाली असून आम्ही अन्वेषण चालू केले आहे’, अशी माहिती दिली. महाराज अन्नग्रहण करत नव्हते, तसेच त्यांनी ‘अ‍ॅलोपॅथी’ उपचार घेण्यासही नकार दिला होता.


Multi Language |Offline reading | PDF