उत्तराखंडमधील भाजप सरकारकडून धर्मद्रोही ‘केदारनाथ’ चित्रपटावर बंदी

  • भाजप सरकारची भूमिका राज्यांनुसार कशी पालटते ?
  • या धर्मद्रोही चित्रपटावर भाजपशासित महाराष्ट्र, गोवा यांसह एकाही राज्यात बंदी घातलेली नाही, हे लक्षात घ्या !
  • वारंवार केदारनाथला जाऊन दर्शन घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धर्मद्रोही ‘केदारनाथ’ या चित्रपटातील हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याविषयी, तसेच ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिले गेल्याविषयी काहीच वाटत नाही का ?
  • भाजपच्या साडेचार वर्षांच्या राजवटीत भाजप सरकारने ‘पद्मावत’, ‘केदारनाथ’ यांसारख्या अनेक धर्मद्रोही चित्रपटांना जाणूनबुजून अनुमती देऊन हिंदूंना आंदोलन करण्यास भाग पाडले, याउलट मुसलमान किंवा ख्रिस्ती यांच्यावर भाजप सरकारने ही वेळ कधीही येऊ दिली नाही ! भाजपला बहुमताने निवडून दिल्याची हिंदूंना मिळालेली ही शिक्षा म्हणायची का ?

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडमधील भाजप सरकारने वादग्रस्त तथा धर्मद्रोही ‘केदारनाथ’ या हिंदी चित्रपटावर बंदी घातली. या चित्रपटातून ‘लव्ह जिहाद’चा प्रचार करण्यात आला असून काही दृश्यांतून हिंदूंच्या धार्मिक भावनाही दुखावण्यात आल्या असल्याचा आरोप केदारनाथ मंदिरातील पुजार्‍यांनी केला होता. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. उत्तराखंड न्यायालयाने चित्रपटावर बंदी घालण्यास नकार दिल्याच्या दुसर्‍याच दिवशी सरकारने त्यावर बंदी घातली.

कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावून ‘केदारनाथ’ हा धर्मद्रोही चित्रपट ७ डिसेंबरला संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटात ‘एका श्रीमंत घरातील मुक्कू नावाची हिंदु मुलगी मन्सूर नावाच्या एका मुसलमान ‘गाइड’च्या (‘माहिती देणार्‍या व्यक्ती’च्या) प्रेमात पडते’, असे दाखवण्यात आले आहे.  याशिवाय केदारनाथ तीर्थक्षेत्री या दोघांमध्ये प्रेमप्रकरण निर्माण झाल्याचेही या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. यामुळेच या चित्रपटातून ‘लव्ह जिहाद’चा प्रचार होत असल्याचा आरोप करत त्यावर बंदी घालण्याची मागणी केदारनाथ मंदिराच्या पुजार्‍यांसह देशभरातील हिंदूंनी केली होती. भाजपनेही या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. या चित्रपटाच्या नावावरही हिंदूंनी आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी उत्तराखंड सरकारने या चित्रपटावर बंदी घातली.

उत्तराखंडमधील भाजप सरकारने प्रथम चित्रपटाला दिली होती मान्यता !

विशेष म्हणजे उत्तराखंडमधील भाजप सरकारने ‘केदारनाथ’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला होता; मात्र भाजपसह स्थानिक राजकीय पक्षांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर या चित्रपटाचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने भाजपचे नेते सतपालसिंह महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ४ सदस्यांची एक समिती स्थापन केली होती. याविषयी माहिती देतांना सतपालसिंह महाराज म्हणाले, ‘‘आमच्या समितीने या चित्रपटाच्या संदर्भातील शिफारसी मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. त्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्याची मुख्य शिफारस करण्यात आली होती. ही शिफारस मान्य करण्यात आली आहे.’’


Multi Language |Offline reading | PDF