‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा नेता असीम शरीफ याचा जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळला

कर्नाटकातील संघस्वयंसेवक रुद्रेश यांच्या हत्येचे प्रकरण

केंद्रात सत्ता असतांना पक्षाची पालक संघटना म्हणून ओळखल्या जाणार्‍या नेत्यांच्या हत्याही रोखू न शकणारा भाजप कधी हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या रोखू शकेल का ? यास्तव हिंदु राष्ट्रच हवे !

बेंगळूरू – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आर्. रुद्रेश यांच्या हत्येच्या प्रकरणातील आरोपी तथा वादग्रस्त ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ अर्थात् ‘पी.एफ्.आय.’चा नेता असीम शरीफ याने जामिनासाठी केलेला अर्ज राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए’च्या) विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सिद्दलिंग प्रभु यांनी फेटाळून लावला. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

१६ ऑक्टोबर २०१६ या दिवशी बेंगळूरूच्या शिवाजीनगर परिसरात रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी मोटरसायकलवरून आलेल्या दोघा धर्मांधांनी रुद्रेश यांना भोसकून ठार केले होते. या प्रकरणी २ आठवड्यांनंतर वसीम अहमद, मुजीब, सादिक, इरफान पाशा आणि असीम शरीफ अशा एकूण ५ जणांना अटक करण्यात आली होती.

या वेळी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे विशेष सरकारी अधिवक्ते पी.एन्. प्रसन्न कुमार यांनी ‘रुद्रेश यांच्या हत्येच्या प्रकरणी असीम शरीफसह आणखी ४ आरोपी आहेत. त्या सर्वांनी ‘सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’ अर्थात् ‘एस्.डी.पी.आय.’ या पक्षाचे नेते अब्दुला रेहमान याच्या नेतृत्वाखाली चालवण्यात येणार्‍या शिबिरात कट्टरवादाचे प्रशिक्षण घेतले. त्या शिबिरामध्ये त्यांना संघाच्या सदस्यांना मारण्यास प्रवृत्त करण्यात आले’, असे न्यायालयास सांगत शरीफच्या जामिनाला जोरदार विरोध केला.


Multi Language |Offline reading | PDF