आतंकवादविरोधी पथकाचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट

नालासोपारा येथे कथित शस्त्रसाठा सापडल्याचे प्रकरण

• हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे नाव घुसडले !

• सनातनच्या ‘क्षात्रधर्म साधना’ या ग्रंथावर आक्षेप !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना आतंकवादी संघटना ठरवून त्यांचे वेगाने चाललेले हिंदुत्वाचे कार्य खंडित करण्याचा डाव कदापि यशस्वी होणार नाही, हा हिंदुत्वनिष्ठांचा विश्‍वास आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध होईल, याची निश्‍चिती बाळगा !

मुंबई  नालासोपारा येथे कथित शस्त्रसाठा सापडल्याच्या प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाने ५ डिसेंबर या दिवशी मुंबई येथील राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयात ६ सहस्र ८४३ पानांचे आरोपपत्र प्रविष्ट केले. ‘या घटनेतील संशयित आरोपी हे सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य काही तत्सम संघटना यांचे सदस्य असून त्यांनी सनातनच्या ‘क्षात्रधर्म साधना’ या ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे ‘हिंदु राष्ट्र’ निर्मितीच्या उद्देशाने प्रेरित होऊन संगनमत करून समविचारी युवकांची आतंकवादी टोळी निर्माण केल्याचे आढळून आले’, असे यात म्हटले आहे. आरोपींवर अवैध कृत्ये प्रतिबंधक कायदा (युएपीए), स्फोटक पदार्थांचा कायदा, ‘आर्म्स अ‍ॅक्ट’ अंतर्गत विविध कलमे लावण्यात आली आहेत.

आरोपपत्रामध्ये सर्वश्री शरद कळसकर, वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर, अविनाश पवार, लीलाधर लोधी, वासुदेव सूर्यवंशी, सुजीथ कुमार, भारत कुरणे, अमोल काळे, अमित बड्डी आणि गणेश मिस्किन या १२ जणांच्या नावांचा समावेश आहे.

आरोपपत्रामध्ये ही आतंकवादी टोळी ‘भारताची एकता, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्व यांना धोका पोहोचवण्याच्या उद्देशाने देशी बनावटीचे पिस्तुल, गावठी बॉम्ब इत्यादींचा उपयोग करून हिंदु धर्म, रूढी यांच्या विरोधात वक्तव्य, विडंबन, लिखाण करणार्‍या व्यक्ती आणि कार्यक्रम यांना लक्ष्य करत आहे, तसेच लोकांमध्ये आतंकवाद निर्माण करत आहे, असे आढळून आले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आरोपपत्रात नमूद करण्यात आलेल्या नावांपैकी ९ जण सध्या पोलिसांच्या कह्यात आहेत.

आरोपपत्रामध्ये शरद कळसकर यांच्या घरी बॉम्ब सिद्ध करण्याची कृती असलेली २ हस्तलिखित चित्रे, वैभव राऊत यांच्या घरी २० जिवंत गावठी बॉम्ब, २ जिलेटिन कांड्या, स्फोटक पावडर आदी वस्तू सापडल्याचे नमूद करण्यात आले आहे. विविध ठिकाणांहून घेण्यात आलेल्या वस्तूंमध्ये सनातनच्या ‘क्षात्रधर्म साधना’ ग्रंथाच्या प्रती असल्याचे म्हटले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या पाश्‍चात्त्य संस्कृतीचा पुरस्कार करणारा ‘सनबर्न’ कार्यक्रमाला आरोपींनी लक्ष्य करून कार्यक्रमात गावठी बॉम्ब, पेट्रोलबॉम्ब, अग्नीशस्त्र, तसेच दगडफेक इत्यादींद्वारे घातपाती कारवाया करून जनतेमध्ये आतंकवाद निर्माण करण्याकरता या कार्यक्रमाच्या ठिकाणी रेकी करण्यात आल्याचे म्हटले आहे. आतंकवादी टोळीने हिंदु धर्म, रुढी, परंपरा यांवर टीकाटिप्पणी करणारे साहित्यिक, विचारवंत आणि सामाजिक व्यक्ती यांना लक्ष्य करून त्यांची रेकी केल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.

*नालासोपारा प्रकरणात महाराष्ट्र ATS ने दाखल केलेल्या चार्जशीटविषयी सनातन संस्थेची भूमिका**१.* चार्जशीटमधे दावा केलेला आहे की संशयित आरोपी हे सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य काही तत्सम संघटना यांचे सदस्य आहेत. पण प्रत्यक्षात यातील कुणीही सनातनचा साधक किंवा समितीचा कार्यकर्ता नाही. यातील काही जणांची नावे तर आम्ही प्रथमच एेकत आहोत.*२.* ATS चा अजून एक हास्यास्पद दावा आहे की सनातनच्या ‘क्षात्रधर्म साधना’ या ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे ‘हिंदु राष्ट्र’ निर्मितीच्या उद्देशाने प्रेरित होऊन आरोपींनी आतंकवादी कृत्ये केली आहेत. प्रत्यक्षात या ग्रंथात हिंदु राष्ट्र या शब्दाचा उल्लेखही नाहीये. ग्रंथात कुठेही आतंकवादी कृत्ये करा असे सांगितलेले नाही. या ग्रंथात रामायण, महाभारत, गीता इत्यादी धर्मग्रंथातील श्लोक घेऊन राजाची कर्तव्ये काय आहेत ? हे सांगितलेले आहे.*३.* ATS चा दावा आहे की डिसेंबर २०१७ मधे आयोजित सनबर्न फेस्टिवलमधे या आरोपींना आतंकवादी कृत्य करायचे होते. प्रत्यक्षात या फेस्टिवलमधे असे कोणतेही आतंकवादी कृत्य घडलेले नाही. सर्व आरोपींना ८ महिन्यांनी अटक झाल्यावर ATS असे दावे करत आहे. आम्ही ATS ला प्रश्न करू इच्छितो की सनबर्न फेस्टिवलसारख्या कार्यक्रमात आतंकवादी कृत्य करून भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना कशी होऊ शकते ?यातून हेच स्पष्ट होते की *सनातन संस्थेला ‘भगवा आतंकवादी’ घोषित करण्यासाठी हे षड्यंत्र रचले जात आहे*. ‘भगवा आतंकवाद’ हे ढोंग रचण्यासाठी काँग्रेस आणि सेक्युलर लोकांनी मालेगाव भाग १ ची खोटी कहाणी तयार केली होती. पुढील काळातील निवडणुकांमधे काँग्रेस आणि सेक्युलर लोकांसाठी अनुकूल वातावरण तयार होण्यासाठी आता या मालेगाव भाग २ मधे सनातनला दोषी ठरवण्यासाठी नवीन खोटी कहाणी तयार केली जात आहे.*आम्ही याचा निषेध करतो. आम्ही हिंदु धर्माच्या प्रचार-प्रसाराचे कार्य निरंतर करतच राहू, हेच या माध्यमातून सांगू इच्छितो.*👇

Posted by Vilas Indolikar on Wednesday, December 5, 2018

सनातनच्या ग्रंथांवर नाहक आक्षेप घेणार्‍यांनो, पुढील धर्मग्रंथातील विचारांविषयी तुम्हाला काय म्हणायचे आहे ?

१. कुराणातील अनेक आयतांमध्ये ‘जे इस्लामला मानत नाहीत, त्यांना जगायचा अधिकार नाही’, असे म्हटले आहे. अल्लाला न मानणार्‍यांना ‘काफीर’ म्हटले असून काफिरांना मारल्यावर ‘जन्नत’ मिळणार असल्याची शिकवण दिली जात आहे.

२. ‘कुराण (९.५) सांगते, ‘तुम्हास मूर्तीपूजक दिसले की, त्यांना तिथेच ठार मारा.’

(संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Sword_Verse)

श्रीमद्भगवद्गीता हा हिंदूंसाठी अत्यंत पवित्र धर्मग्रंथ असून त्यात क्षात्रधर्म साधना आहे !

सनातनच्या ‘क्षात्रधर्म साधना’ ग्रंथावर बंदी घालण्याची मागणी करणार्‍यांना पुढील श्‍लोकाविषयी काय म्हणायचे आहे ?

हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।

तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्‍चयः ॥ २-३७ ॥ (श्रीमद्भगवद्गीता)

अर्थ : युद्धात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील अथवा युद्धात जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना, तू युद्धाचा निश्‍चय करून उभा रहा.

गीतेत जरी ‘क्षात्रधर्म साधना सांगितली असली, तरी त्याची शिकवण समजून – उमजून घेऊन आचरण करण्याइतपत हिंदू विवेकी आहेत. त्यामुळेच आतापर्यंत अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठीच हिंदूंनी शस्त्र हाती घेतले, कुणाचा खून अथवा संहार करण्यासाठी नव्हे. त्यामुळेच जगभरात हिंदु समाज ‘सुसंस्कृत आणि सहिष्णु समाज’ म्हणून ओळखला जातो !


Multi Language |Offline reading | PDF