सर्वधर्मसमभावापायी राममंदिर आणि बाबरी मशीद बाजूबाजूला बांधण्याचा घाट घालणार्‍यांना सडेतोड प्रत्युत्तर देणारे भाजपचे तत्कालीन खासदार योगी आदित्यनाथ !

‘वर्ष २०१५ मध्ये अयोध्या वादासंदर्भात तोडगा काढण्यासाठी बाबरी मशिदीचे पक्षकार अन्सारी आणि आखाडा परिषदेचे महंत ज्ञानदास यांनी त्या भूमीत मंदिर अन् मशीद बाजूबाजूला उभारण्याचा प्रस्ताव ठेवला होता. भाजपचे (तत्कालीन) खासदार योगी आदित्यनाथ यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला. ते म्हणाले, ‘‘जर मक्का-मदिनेत आणि व्हॅटिकन येथे हिंदूंचे मंदिर बनू शकत नाही, तर मग अयोध्येतही कोणतीही मशीद उभारता येणार नाही. अयोध्या ही रामजन्मभूमी असल्याचे भारताच्या न्यायालयानेही मान्य केले आहे. श्रीराम हे हिंदूंचे आराध्य दैवत असून त्याची जन्मभूमी ही कोट्यवधी हिंदूंसाठी पवित्र आहे. त्यामुळे तेथे राममंदिराची निर्मिती होणे आवश्यक आहे. मुसलमानांसाठी मक्का आणि ख्रिस्त्यांसाठी व्हॅटिकन ही पवित्र स्थळे आहेत. तेथे हिंदूंचे मंदिर उभारण्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही, मग अयोध्येत मशीद उभारण्याचा आग्रह का धरता ?’’ (वर्ष २०१५)


Multi Language |Offline reading | PDF