डॉ. (सौ.) कस्तुरी भोसले यांनी त्यांची मुलगी कु. मधुरा भोसले हिने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केल्यानंतर श्रीगुरूंविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता वाचून एका साधिकेने व्यक्त केलेले मनोगत !

आधुनिक वैद्या (सौ.) कस्तूरी भोसले

डॉ. (सौ.) भोसलेकाकू (आणि एका आईलाही),

काकू, तुमची मुलगी कु. मधुरा हिने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यामुळे तुम्ही दैनिक सनातन प्रभातमध्ये श्रीगुरूंविषयी व्यक्त केलेले कृतज्ञतापर लिखाण आज वाचले. तुमचा लेख वाचल्यानंतर केवळ बाह्य शब्दांनी मनातील विचार व्यक्त करणे कठीण वाटले; म्हणून तुम्हाला लिहून पाठवते.

१. कृतज्ञतास्वरूप सुंदर पुष्पांची भावांजली श्री गुरूंच्या चरणी अर्पण केली असणे

तुम्ही लेख सुंदरच लिहिला आहे. लेखातील प्रत्येक शब्दातून आत्मनिवेदनस्वरूप, कृतज्ञतास्वरूप सुंदर पुष्पांची भावांजली श्रीगुरूंच्या चरणी अर्पण केली आहे. लेखात ज्या उत्कटतेने तुम्ही तुमची स्थिती व्यक्त केली आहे, ती आरस्पानी (आरशासारखी) आहे.

२. मुलीला सर्वच स्तरांवर जपण्याचा प्रयत्न करणे

मधुराताईचा त्रास तुम्ही प्रत्यक्ष पाहिला आणि परात्पर गुरुदेवांनी क्षणोक्षणी जाणला. त्यांनी तुम्हा दोघींना सांभाळले. एक आई म्हणून आणि त्याहीपेक्षा स्वतःच्याच मुलीकडे देवाची साधिका म्हणून पहाण्याची तुमची सततची धडपड, कधी स्वतःतील मातृत्वापुढे हतबल होऊन लेकरासाठी देवाचा धावा करणार्‍या आईची आर्तता, आपण साधक आहोत, तर त्याही दृष्टीने ताईच्या सेवेत न्यून-अधिक होऊ नये; म्हणून तुमचा असलेला विचार, हे बघून माझे मन तुमच्यासमोर नतमस्तक झाले.

३. अन्य साधकांकडून साहाय्याची अपेक्षा नसणे

काकू, आम्ही बाहेरून केवळ तुमची धावपळ बघायचो, ताईसाठी प्रसाद-महाप्रसाद नेतांना तुम्हाला बघायचो; पण ‘तुम्ही कशा स्थितीतून जात आहात ?’, हे तुम्ही आम्हाला कधीच फारसे जाणवू दिले नाही.

४. ‘आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना सांभाळणे’, ही मनाची साधना

लेखात म्हटल्याप्रमाणे ताईच्या प्रगतीविषयी फलकावर वाचल्यावर ताईसाठी मला आनंद झाला आणि माझ्या मनात तुम्हा दोघांविषयी (तुम्ही आणि परात्पर गुरुदेव यांच्याविषयी) विचार आला. गुरुच त्रास असणार्‍या साधकांना जाणू शकतात आणि सांभाळू शकतात. ‘त्रास असलेल्या साधकांना सांभाळणे, एकेक दिवस जिवंत ठेवणे, हे पुष्कळ कठीण असते. तुमचे तर आई-मुलीचे नाते ! याही वयात ‘इतकी शारीरिक धावपळ करणे, सतत तत्पर रहाणे, सातत्याने समजून घेणे, मनात होत असणार्‍या संघर्षावर मात करणे’, किती कठीण असेल ! ही मनाची साधना आहे.

काकू,

तुमच्यातील सुंदर भावविश्‍वाला माझे नमन ।

तुमच्यातील वत्सल आईला माझे नमन ।

तुमच्यातील समजून घेण्याच्या गुणाला माझे नमन ।

तुमच्या आणि ताईच्या दोघींच्या

हृदयात असलेल्या ईश्‍वराला माझे नमन ।

परात्पर गुरु डॉक्टरांप्रती श्रद्धारूपी दीपाला

आणि कृतज्ञतेला माझे अखंड नमन ॥

‘श्रीगुरूंनी या लेखातून जे शिकवले, मनात कृतज्ञता आणि शरणागतभाव निर्माण केला, तो अखंड टिकून रहावा’, अशी त्यांच्या पावन आणि सर्वज्ञ अशा चरणी प्रार्थना !

कृतज्ञता काकू… !

– तुमची,

सौ. वसुधा, सनातन आश्रम, गोवा. (१२.११.२०१८)

साधिकेने लिहिलेले कृतज्ञतापत्र वाचून डॉ. (सौ.) कस्तुरी भोसले यांनी व्यक्त केलेले मनोगत !

१. भावजागृती होणे

‘हे कृतज्ञतापत्र वाचून माझी भावजागृती झाली. अनेक साधकांनी मला प्रत्यक्ष आणि भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘लेख वाचून आध्यात्मिक त्रास किती तीव्र प्रमाणात असतो’, याची थोडीफार कल्पना आली. ‘प्राणशक्ती अल्प असल्यामुळे कु. मधुराताई खोलीत झोपून असते’, एवढेच आम्हाला ठाऊक होते.’’

२. त्रास असणार्‍या साधकांना साहाय्य करू शकत नसल्याची खंत वाटणे

‘परात्पर गुरुदेवा, मधुराप्रमाणेच अनेक साधक आश्रमात आणि घरी राहून अशा प्रकारचे असह्य त्रास सहन करत आहेत. मला त्या सर्वांना थोडेतरी साहाय्य करावे’, असे वाटते; परंतु मला आध्यात्मिक त्रास असल्यामुळे माझी प्राणशक्ती अल्प असते. मी त्यांना साहाय्य करू शकत नाही, यासाठी मी तुमची आणि त्या सर्वांची क्षमायाचना करते.

३. महान परात्पर गुरुदेव सर्व साधकांना त्रासातून बाहेर काढणारच आहेत !

माझी साधना अल्प असल्याने मी त्यांना साहाय्य करू शकत नसले, तरी मी त्यांना एवढेच सांगू इच्छिते, ‘परात्पर गुरुदेव महान आहेत. ते प्रत्येक साधकाची प्रत्येक क्षणी काळजी घेत आहेत. ‘आता केवळ दोनच मास (महिने) हा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यानंतर सर्व साधक त्रासातून बाहेर पडतील आणि परात्पर गुरुदेव त्यांना सर्वोच्च आनंद देतील’, याची मला निश्‍चिती आहे.’

परात्पर गुरुदेवा, केवळ तुमच्यामुळे आम्हाला संत आणि अगणित साधक यांच्याकडून अलोट प्रीती लाभली, तसेच आपले आमच्या पुढील प्रगतीसाठी अमूल्य कृपाशीर्वाद लाभले, यासाठी आपल्या मंगलमय आणि पावन चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

– डॉ. (सौ.) कस्तुरी भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.११.२०१८)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now