हिंदूंनी शतकानुशतके लढला रामजन्मभूमीच्या मुक्ततेसाठी रक्तरंजित लढा !

हिंदूंनी ७७ वेळा संघर्ष करूनही रामजन्मभूमी मुक्तीच्या प्रतीक्षेत !

बाबरी मशीद पाडल्याचा दिवस (६ डिसेंबर) मुसलमान ‘काळा दिवस’ म्हणून पाळतात, तसेच जिहादी आतंकवादी त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी घातपाती कारवाया घडवून आणण्याचा कट रचतात ! जिहाद्यांनी हिंदूंची लाखो मंदिरे पाडली. हिंदूंनो, याचा निषेध सनदशीर मार्गाने, परंतु परिणामकारक भाषेत करायला शिका !

६ डिसेंबर १९९२ या दिवशी कारसेवकांकडून बाबरी मशीद पाडतांनाचा ऐतिहासिक क्षण ! रामजन्मभूमीच्या मुक्ततेसाठीचा हा हिंदूंचा ७७ वा संघर्ष होता !

मर्यादापुरुषोत्तम श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमीवर असलेले मंदिर उद्ध्वस्त करून त्या स्थानी हिंदूंवर अत्याचार करणारा क्रूर आक्रमक जहिरूद्दीन बाबर याने १६ व्या शतकात मशीद उभारली. याच्याशी संबंधित काही ऐतिहासिक दस्तावेज येथे देत आहोत. हिंदूंच्या श्रद्धास्थानाचा हा लढा शतकानुशतके चालू असूनही रामजन्मभूमी अद्यापही मुक्ततेच्या प्रतीक्षेत आहे.  

१. रामजन्मभूमी नष्ट करण्यासाठी बाबराने काढलेले ‘शाही फर्मान’ !

स्वामी सत्यदेव परिव्राजक यांनी रामजन्मभूमीच्या संदर्भात लेख लिहितांना ६.७.१९२४ या दिवशी ‘मॉडर्न रिव्यू’ या अंकामध्ये बाबरच्या वतीने प्रसारित केलेले एक ‘शाही फर्मान’ प्रकाशित केले. ते पुढीलप्रमाणे –

‘शाहंशाहे हिंद मालिकूल जहां बादशाह बाबर आणि हजरत जलालशाह यांच्या आदेशानुसार अयोध्येमध्ये रामाच्या जन्मभूमीला नष्ट करून त्या जागी त्याच साहित्याने मशीद बांधण्याची अनुमती दिली गेली आहे. या आदेशानुसार तुम्हाला सांगण्यात येते की, ‘अयोध्येच्या व्यतिरिक्त हिंदुस्थानातील इतर कोणताही हिंदु अयोध्येला पोहोचू नये. ज्या व्यक्तीच्या संदर्भात शंका वाटेल की, अमुक व्यक्ती रामजन्मभूमी येथे जाऊ शकते, अशा व्यक्तीला त्वरित पकडून ठार मारले जावे. आदेशानुसार त्याची कार्यवाही करणे आपले कर्तव्य समजावे.’

या आदेशानुसार हे लक्षात येते की, त्या वेळचे शासन समजत होते की, रामजन्मभूमीवरील मंदिर तोडून त्या जागी मशीद बनवणे सोपे काम नाही. या आदेशाचा हिंदूंवर काय प्रभाव पडला ? याचे विवरण उपलब्ध नाही.

२. बाबराचा वजीर मीरबांकी याने हिंदूंच्या हत्या करून तोफेच्या साहाय्याने रामजन्मभूमी येथील मंदिर पाडणे

अलेक्झांडर सर कर्निघमच्या लखनऊ येथील स्थलवर्णन कोशामध्ये (गॅजेटियर) प्रकाशित झालेल्या दस्तावेजानुसार सांगितले आहे की, युद्ध करतांना १ लक्ष ७४ सहस्र हिंदू मारले गेले आणि त्यांच्या मृतदेहाचा ढीग लावला गेला. त्या वेळी बाबराचा वजीर ‘मीरबांकी’ याने तोफेच्या साहाय्याने रामजन्मभूमी येथील मंदिर पाडले.

३. हिंदूंच्या रक्ताने गार करून लाहौरी विटेच्या साहाय्याने मशिदीची निर्मिती !

दुसरा एक इंग्रजी लेखक हॅमिल्टन याने ‘बारांबाकी’ कोशामध्ये (‘गॅजेटियर’मध्ये) लिहिले आहे की, जलालशाह याने हिंदूंच्या रक्ताच्या साहाय्याने गारा करून नवीन ‘लाहौरी’ विटेचा वापर मशीद बांधण्यासाठी केला होता. राममंदिर पाडून मशीद उभारणीची प्रेरणा देणारा ‘तास्सुन्न मुसलमान फकीर कजल अब्बास मुसा अशिकान कलंदर’ होता. त्याची अयोध्येला मक्केचे स्वरूप देण्याची इच्छा होती.

४. राममंदिर पाडून मशीद उभारल्याचा बाबरनाम्यात उल्लेख !

बाबराने बाबरनाम्यामध्ये लिहून ठेवले आहेे की, ‘हजरत कजल अब्बास मुसा अशिकान कलंदर’ याच्या अनुमतीने रामजन्मभूमीवरील मंदिर नष्ट करून त्या पाडलेल्या मंदिराच्या साहित्याने त्याच जागी मशिदीची उभारणी केली. (बाबरनामा – पृष्ठ १७३)

५. अयोध्येच्या आसपासच्या गावांतील क्षत्रियांचा रामजन्मभूमीच्या मुक्ततेसाठी लढा !

हिंदू शांत बसले नाहीत. बाबरचा मुलगा नसिरूद्दीन हुमायूँच्या वेळी अयोध्येच्या जवळ स्थायिक असलेल्या सराय सिरसिण्डा आणि राजेपूर या गावांतील १० सहस्र सूर्यवंशीय क्षत्रीय  (हिंदू) रामजन्मभूमीच्या रक्षणासाठी एकत्र आले. त्यांनी मंदिराच्या ठिकाणी असलेल्या सर्व शाही छावण्या तोडून टाकल्या, तंबू फेकून दिले आणि मशिदीचा पुढचा दरवाजा तोडून टाकला. तिसर्‍या दिवशी शाही सेना आल्यावर सर्व क्षत्रीय युद्ध करतांना मारले गेले. त्यांच्या गावामध्ये आग लावली गेली.

६. अकबराच्या काळात रामजन्मभूमीच्या संदर्भात लढा उभारून मंदिरासाठी चौथरा सिद्ध करणे

हुमायूँचा मुलगा जलालुद्दीन अकबराच्या काळामध्ये याच क्षत्रियांनी पुन्हा संघटित होऊन रामजन्मभूमी प्राप्त करण्याच्या हेतूने आक्रमण केले; परंतु शाही सेना सावध होती. महाभयंकर लढाई झाली. हिंदूंनी पराक्रम करून शाही सेनेचा पाडाव करून मशिदीसमोर मंदिरासाठी एक कट्टा सिद्ध केला. ही घटना अकबराला कळल्यानंतर राजा बिरबल आणि टोडरमल यांनी अकबराला पुष्कळ समजावले. अकबराने त्याच कट्ट्यावर भगवान श्रीरामाची प्रतिमा स्थापन करण्याची आज्ञा केली. ‘दिवाने अकबरी’मध्ये लिहिले आहे की, रामजन्मभूमीला परत मिळवण्यासाठी हिंदूंनी २० वेळा आक्रमण केले. हिंदु जनतेच्या हृदयाला धक्का पोहोचू नये, यासाठी जलालुद्दीन अकबराने राजा बिरबल आणि टोडरमल यांच्या मतानुसार बाबरी मशिदीच्या समोर एक कट्टा (विटेच्या साहाय्याने बनवलेला उंचवटा) सिद्ध करून त्यावर एक लहानसे राममंदिर स्थापन करण्याची अनुमती दिली अन् आदेश दिला की, ‘कोणीही हिंदूंच्या पुजापाठमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा करू नये.’ अकबराचा मुलगा नुरुद्दीन जहांगीर आणि जहांगीरचा मुलगा शाहबुद्दीन शाहजहाँ यांच्या कार्यकालापर्यंत वरीलप्रमाणे व्यवस्था शांततेने चालत राहिली.

७. शाहजहाँच्या कार्यकालानंतर क्रूर औरंगजेब गादीवर बसताच रामजन्मभूमीवर प्रथम आक्रमण !

शाहजहाँचा मुलगा महीयुद्दीन आलमगीर औरंगजेब होता. हा बादशाह हिंदूंचा द्वेष करणारा क्रूर शासक होता. हा इतिहास प्रसिद्ध आहे. राजगादीवर बसल्याबरोबर त्याचे लक्ष अयोध्येकडे गेले आणि त्याने आपला सरसेनापती जाबांज खाँ याच्या नेतृत्वाखाली  अयोध्येला सेना पाठवली. मंदिराच्या रक्षणासाठी असलेल्या हिंदूंना ही सूचना अगोदरच पोहोचली होती. शेवटी मूर्ती आणि पूजेचे साहित्य लपवले गेले आणि रात्रीच जवळच्या गावामध्ये फिरून मंदिरावर होणार्‍या आक्रमणाची सूचना दिली गेली. यामुळे हिंदूंची एक जबरदस्त तुकडी मंदिराच्या रक्षणासाठी रामजन्मभूमीवर दाखल झाली.

८. समर्थ रामदासस्वामींचे शिष्य ‘वैष्णवदास’ यांच्यासमवेत असणार्‍या चिमटाधारी साधूंचा रामजन्मभूमी रक्षणासाठी सहभाग !

अयोध्येतील अहिल्या घाटावर ‘परशुराम मठा’मध्ये समर्थ गुरु रामदासस्वामींचे  शिष्य ‘वैष्णवदास’ रहात होते. त्यांच्यासमवेत दहा सहस्र चिमटाधारी साधूंचा एक दल होता.

जेव्हा त्यांना रामजन्मभूमीवर होणार्‍या आक्रमणाची सूचना मिळाली, तेव्हा हे साधू हिंदूंच्या  तुकडीला जाऊन मिळाले. या एकत्रित तुकडीने उर्वशीकुण्डावर मोगल सैन्याचा चिकाटीने विरोध केला. सात दिवस घनघोर युद्ध चालू राहिले. या वीरांच्या पराक्रमामुळे शाही सेनेने मैदान सोडून पळ काढला.

९. रामजन्मभूमीच्या रक्षणासाठी हिंदू आणि शीख यांनी एकत्रित येऊन मोगल सैन्याचा पाडाव करणे

शाही सेनेचा पराभव झाल्याची बातमी औरंगजेबाला मिळाली. तेव्हा तो अत्यंत क्रोधित झाला आणि जाबांज खाँ याला पदच्युत करून सैय्यद हसन अली याला पन्नास सहस्र सैन्य देऊन रामजन्मभूमी नष्ट-भ्रष्ट करून टाकण्यासाठी पाठवले. आयोध्येत साधूंचीही तुकडी सावधान होती. वैष्णवदास यांनी गुरु गोविंदसिंह यांच्या जवळ साहाय्यासाठी सूचना पाठवली. सूचना मिळाल्याबरोबर शिखांची जबरदस्त सेना घेऊन गुरु गोविंदसिंह यांनी ब्रह्मकुंडावर सैन्य जमा केले. युद्धात यश मिळवण्याच्या दृष्टीने या लोकांनी आपल्या सैन्याचे तीन विभाग केलेे. तिन्ही दलांच्या योजनेनुसार क्रमश: वेगवेगळे, तसेच एकत्रित मिळून शाही मोगल सेनेला गुरु गोविंदसिंहांच्या सैन्याने मारून पळवले. मोगल सेनापती हसन अली या युद्धात मारला गेला. या पराभवाने औरंगजेबावर एवढा प्रभाव पडला की, चार वर्षांपर्यंत या रामजन्मभूमीवर पुन्हा दुसर्‍यांदा आक्रमण करण्याचे साहस त्याने केले नाही.

१०. बेसावध हिंदूंवर आक्रमणाद्वारे दहा सहस्र हिंदूंची हत्या करून रामजन्मभूमी ताब्यात घेणारा औरंगजेब !

चार वर्षांपर्यंत शांत राहिल्यानंतर हिंदू बेसावध झाले. परिणामी वर्ष १६६४ मध्ये औरंगजेब याने रामजन्मभूमीवर पुन्हा आक्रमण केले. शाही सेनेने दहा सहस्र हिंदूंची हत्या केली. त्यांचे मृतदेह मंदिराच्या पूर्व भागात स्थित असलेल्या नवकोणातील ‘कर्न्दप’ विहीरीमध्ये भरून ठेवले आणि चारही बाजूंनी भिंत बांधून त्याला घेरले. ती ‘कर्न्दप’ विहीर आजही मंदिराच्या पूर्वेकडील दारासमोर स्थित आहे. याला मुसलमान स्वत:ची संपत्ती असल्याचे सांगतात. याच युद्धानंतर शाही सेनेने रामजन्मभूमीचा कट्टा खोदून त्याला गडाचे रूप दिले. हिंदू याच गडाला श्रीरामनवमीच्या दिवशी फुले वाहतात.

११. रामजन्मभूमीच्या मुक्ततेसाठी हिंदूंचे सातत्याने प्रयत्न !

अ. औरंगजेबाच्या नंतर लखनऊमध्ये नवाबीचा उदय झाला, तेव्हा ‘नवाब सहादत अली खाँ’ गादीवर बसला. त्या वेळी हिंदूंनी पुन्हा रामजन्मभूमीच्या प्राप्तीसाठी आक्रमण केले; परंतु ते पराभूत झाले.

आ. लखनऊच्या गादीवर नवाब नसिरूद्दीन हैदर बसला, त्या वेळी हिंदूंनी रामजन्मभूमीला प्राप्त करण्यासाठी पुन्हा आक्रमण केले. आठ दिवस घोर युद्ध झाले. या युद्धामध्ये भीटी हसवर, मकरही ख्जुरहट दियरा, अमेठीचा राजा गुरुदत्त सिंह इत्यादी एकत्रित झाले होते. शाही सेना हिंदूंना पछाडत हनुमान गडापर्यंत आली. तेथे साधूंच्या चिमटाधारी सैन्याने हिंदु विरांच्या सेनेबरोबर एकत्रित होऊन शाही सेनेला मार देऊन पळवले आणि रामजन्मभूमी हिंदूंच्या अधिकारात घेतली. हा अधिकार अधिक दिवस राहिला नाही. शाही सेनेने पुन्हा येऊन रामजन्मभूमी बळकावली.

१२. नवाब काळात रामजन्मभूमीच्या मुक्ततेसाठी हिंदु राजांनी संघटितपणे लढा देऊन मुसलमानांना अयोध्येच्या बाहेर पळवले !

नवाब वाजीद अलीशाहच्या वेळी हिंदूंंनी रामजन्मभूमीच्या उद्धारासाठी पुन्हा आक्रमण केले. या आक्रमणामध्ये अवधमधील दोन-चार राजे सोडले, तर सर्व हिंदु राजे सहभागी होते. या युद्धाच्या विषयाच्या संदर्भात कनिंघम याने फैजाबादच्या साहित्यिक संग्रहाच्या पुस्तकामध्ये लिहिले आहे की, या वेळी शाही सेना बाजूला होऊन रामजन्मभूमीच्या मुक्तीचा तमाशा पहात होती. हिंदू आणि मुसलमान यांना हा वाद आपापसात लढून मिटवावा, असे सांगण्यात आले होते. दोन दिवस घनघोर युद्ध झाले. मुसलमान पराभूत झाले. क्रोधित झालेल्या हिंदूंनी मुसलमानांची घरे फोडणे, कबरे तोडणे आणि मशिदीला नष्ट करणे आदी कृती केल्या. या वेळी मुसलमानांच्या कोंबड्यांनाही त्यांनी सोडले नाही. एवढे होऊनही स्वत:च्या मर्यादा सांभाळून त्यांनी मुसलमान स्त्रिया आणि मुले यांना कोणती हानी पोहोचवली नाही. अयोध्या नगरीमध्ये प्रलय झाला. मुसलमान अयोध्या सोडून पळू लागले. मुसलमानांच्या या दुर्दशेला पाहून शाही सेनेने (या सेनेत अधिक प्रमाणात इंग्रज होते.) या स्थितीला हाताबाहेर जाऊ न देता शहरामध्ये संचारबंदी लागू केली. या वेळी अयोध्येचा महाराजा मानसिंह याने नवाब वाजिद अलिशाह याचे मत घेऊन हिंदूंना आज्ञा दिली की, ते रामजन्मभूमीवर पुन्हा चौथरा बांधू शकतात. या चौथर्‍यावर गवताच्या काड्यापासून उंच मंदिर सिद्ध करून प्रतिमा स्थापन करण्यात आली.

१३. इंग्रजांच्या काळात दोनदा रामजन्मभूमीच्या मुक्ततेसाठी हिंदूंनी लढून मशीदीची तोडफोड केली; मात्र इंग्रज अधिकार्‍याने ती पुन्हा बांधली !

अ.  इंग्रजांच्या सत्ताकाळात दोन वेळा रामजन्मभूमीच्या प्राप्तीसाठी आक्रमण झाले. पहिले आक्रमण वर्ष १९१२ मध्ये झाले. या आक्रमणात बाबरी मशिदीला कोणतीही हानी पोचू दिली नाही.

आ. दुसरे आक्रमण वर्ष १९३४ मध्ये झाले. या आक्रमणामध्ये बाबरी मशीद तोडून टाकली. फैजाबादमधील उपायुक्त जे.पी. निकलसन याने मशीद पुन्हा बांधली. बाबरी मशिदीच्या एका स्थानावर लिहिले होते की, २७.३.१९३४ अनुसार जीउल हिज्जा सन १३५२ हिजरी (मुसलमान कालगणना वर्ष या अर्थाने) या दिवशी हिंदूंनी नष्ट केलेली मशीद तहव्वर खाँ या ठेकेदाराने अत्यंत चलाखीने पुन्हा बांधली.

१४. रामजन्मभूमीच्या मुक्ततेसाठी हिंदूंनी ७७ वेळा लढा देऊनही जन्मभूमी मुक्तीच्या प्रतीक्षेतच !

वर्ष  १९९२ मधील ६ डिसेंबर या दिवशी बाबरी मशिदीवर जे काही झाले, त्यासंदर्भात सर्व लोक परिचित आहेत. रामजन्मभूमीच्या उद्देशाने आजपर्यंत ७७ आक्रमणे झाली आहेत. बाबरच्या काळात ४, हुमायूँच्या काळात १०, अकबराच्या काळात २०, औरंगजेबाच्या काळात ३०, शहादत अलीच्या काळात ५, नसिरूद्दीन हैदरच्या काळात ३, वजिद अलीच्या काळात २, इंग्रजांच्या काळात २, माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या काळात एक वेळा, एवढा मोठा हा लढा होता.

भारतीय जनतेला संतोष त्याच दिवशी होईल, जेव्हा काशी, मथुरा, अयोध्या इत्यादी सहस्रो स्थानांतील मुसलमान आक्रमकांच्या खुणा सर्वप्रकारे धुळीला मिळवून दिल्या जातील. ज्यांची ही मूळ वस्तू आहे, त्यांना ती परत मिळालीच पाहिजे. कोणी चोर, डाकू कोणाचे पदार्थ हातातून घेतले, तर राजाचे कर्तव्यच आहे की, त्याची वस्तू त्याला परत देणे आणि हरण करणार्‍याला दंडित करणे. ही दंड व्यवस्थाच प्रजेला सुरक्षित करून शांतीने रहाण्याची सुविधा प्रदान करू शकते.

– गुरुकुल झज्जर, हरियाणा

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now