शांततेसाठी पाकने भारताला सहकार्य करावे ! – अमेरिका

आतंकवादाच्या सूत्रावरून स्वत:च्या शत्रूराष्ट्रावर धडक कृती करणारी अमेरिका भारताच्या संदर्भात पाकला फुकाचे सल्ले देऊन दिखाऊपणा करते, असे म्हटल्यास चूक ते काय ? अमेरिका पाकला खडसावत का नाही ?

वॉशिंग्टन – भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत आतंकवाद अन् काश्मीर सूत्रावरून तणाव असून दोन्ही देशात शांतता रहावी, यासाठी पाकिस्तानने भारताला सहकार्य करावे, अशी सूचना अमेरिकचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी पाकिस्तानला केली. अमरिकेच्या दौर्‍यावर असलेल्या भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांच्या स्वागतानंतर मॅटिस पत्रकारांशी बोलत होते. अफगाणिस्तानला जर युद्ध संपवायचे असेल, तर शेजारी राष्ट्र म्हणून पाकिस्तानने तालिबान समवेतच्या शांतता चर्चेमध्येही महत्त्वाची भूमिका बजावणे आवश्यक आहे, असेही त्यांनी पाकला सांगितले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now