महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा त्वरित लागू करावा ! – वारकरी संप्रदायाची महाअधिवेशनात मागणी

धर्मद्रोही संघटनांच्या धमक्यांना न जुमानता वारकर्‍यांचे महाअधिवेशन संपन्न !

आळंदी येथे ४ डिसेंबरला येथील श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा येथे श्री संत ज्ञानेश्‍वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय वारकरी सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भव्य राज्यव्यापी चौदावे वारकरी महाअधिवेशन’ उत्साही वातावरणात पार पडले. या महाअधिवेशनात वारकरी संप्रदाय, संत, महंत यांनी महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा त्वरित लागू करावा, अशी जोरदार मागणी केली. महाअधिवेशनात मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार येथे देत आहोत…

देवस्थानाचा पैसा सरकारने परत करावा आणि भविष्यात हिंदु धर्मपिठांकडे पैशांची मागणी करू नये ! – ह.भ.प. ईश्‍वरजी महाराज

मंदिरात भक्तांनी अर्पण केलेले पैसे सरकार इतर विकासकामांवर खर्च करणार असेल, तर ते कदापी सहन केले जाणार नाही. सरकारकडे मोठ्या प्रमाणात निधी असतो, त्याचा वापर विकासकामांसाठी करावा. वारकरी, भक्त यांनी पोटाला चिमटा काढून १, ५१ आणि १५१ रुपये, असे कष्टाचे पैसे धर्मकार्यासाठी अर्पण केलेले असतात. त्यामुळे हा पैसा धर्मकार्यासाठीच वापरला पाहिजे. पूर्वीची गुरुकुल पद्धत, गोशाळा, ग्रंथसंपदा, अशा अनेक प्रकारच्या धर्मकार्यासाठी निधीची आवश्यकता आहे. सरकार जर हा पैसा इतर कामांसाठी वापरत असेल, तर त्याला हिंदूंनी संघटितपणे विरोध केला पाहिजे. आम्ही सरकारला सांगतो की, देवस्थानाचा पैसा सरकारने परत करावा आणि भविष्यात हिंदु धर्मपिठांकडे पैशांची मागणी करू नये. सरकारने देवस्थानातील पैसा इतरत्र वापरल्यास त्याला वेगळे वळण लागू शकते. येथे वारकरी सर्व एकत्र झाल्याने अधिवेशन यशस्वी झाले आहे. तरीही आमच्या मागण्या पूर्ण झाल्याविना आम्ही गप्प बसणार नाही.

येत्या २ मासांत पंतप्रधानांना राममंदिर उभे करण्याची घोषणा करावीच लागेल ! – हिंदूभूषण श्याम महाराज राठोड

सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांनी राममंदिर उभे केले नाही, त्याचे नावही घेत नाहीत. येत्या २ मासांत पंतप्रधानांना राममंदिर उभे करण्याची घोषणा करावीच लागेल. अयोध्येत रामाचा जन्म झालेला असल्याने तेथेच राममंदिर झाले पाहिजे. धर्माच्या नावाने देशात फाळणी झाली, याला नेहरु-गांधी उत्तरदायी आहेत. देशात हिंदूंपेक्षा मुसलमानांची संख्या झपाट्याने वाढत आहे. समान नागरी कायदा हवा. नथुराम गोडसे नसते, तर देशाचे १०० तुकडे झाले असते. त्यामुळे मी नथुराम गोडसे यांच्या देशभक्ती आणि चांगुलपणाला नमस्कार करतो. देशातील काही राज्यांतील गावांत ‘हिंदूंना प्रवेश नाही’, असे फलक लागले आहेत. परदेशातून आलेल्या काही वृत्तवाहिन्या केवळ हिंदु धर्म, भगवा यांची अपकीर्ती करत आहेत. अनेक खटले प्रविष्ट असलेल्या इमाम बुखारी यांच्यावर अटकेची कारवाई होत नाही; मात्र पोलीस हिंदु संतांवर लगेच कारवाई करतात. पोलिसांनी असे न करता सर्वांना समान न्याय दिला पाहिजे. समाजात शेळ्या मेंढ्याऐवजी वाघांची संख्या वाढली पाहिजे. अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा सत्कार झाल्याविषयी अभिनंदन करतो, त्यांनी सदैव वारकर्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे.

यापुढेही कोणत्याही विरोधाला न जुमानता महाअधिवेशन देविदास धर्मशाळेतच होईल ! – ह.भ.प. निरंजन शास्त्री कोठेकर महाराज

या अधिवेशनाचे सर्व श्रेय राष्ट्रीय वारकरी सेना आणि हिंदु जनजागृती समितीला जात आहे. काही कारणांमुळे पू. भिडेगुरुजी आज येऊ शकले नाहीत; मात्र ते नंतर येतील याची आम्हाला खात्री आहे. माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आणि यापुढेही कोणत्याही विरोधाला न जुमानता हे महाअधिवेशन या देविदास धर्मशाळेतच होईल, याची मी ग्वाही देतो.

धर्मांतरबंदी कायदा न केल्यास वारकरी विधानभवनासमोर आंदोलन करतील ! – ह.भ.प. योगी दत्तानाथ महाराज, चंद्रपूर-धुळे

मी माझ्या प्रत्येक कीर्तनाचा ‘वन्दे मातरम्’ने प्रारंभ करतो. कार्यक्रमाच्या वेळी जो ‘वन्दे मातरम्’ म्हणत नाही, तो आपला नसून घुसखोर आहे, असे समजावे. या अधिवेशनाला श्री शिवप्रतिष्ठानचे, संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी हे वारकरी असतांना त्यांच्यावर येथे येण्यास बंदी का घालण्यात आली ? इतर लोक राष्ट्र आणि धर्मविरोधी बोलत असतांना त्यांना प्रतिबंध केला जात नाही; मात्र पू. भिडेगुरुजी यांना प्रतिबंध केला जातो, ही शोकांतिका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाने आम्हाला आमची बाजू मांडण्याचा अधिकार दिला आहे. पू. भिडेगुरुजी यांना विरोध होण्याचे मुख्य कारण म्हणजे हिंदू, वारकरी असंघटित आहेत.

केवळ आमीष दाखवून धर्मांतर होत नाही. त्याला जातीवाद कारणीभूत आहे. हिंदू जातीपातीमध्ये अडकला असून तो विभक्त झाला आहे. हिंदु धर्मातील ज्ञान आणि शास्त्र समजून घेतले नसल्याने हिंदूंचे धर्मांतर होत आहे. जातीभेद, द्वेष, इतर जातीतील हिंदूंना अल्प लेखणे, ही धर्मांतर होण्याची मुख्य कारणे आहेत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील प्रत्येक गावात चर्च झाले आहे. परदेशातून येणारा पैसा धर्मांतरासाठी वापरला जातो, याची भारत सरकारला माहिती नाही. धर्मांतरविरोधी कायदा होण्यासाठी येथे झोपलेल्या हिंदूंना जागे करण्यासाठी हे महाअधिवेशन घेतले आहे. धर्मांतरबंदी कायदा न केल्यास वारकरी विधानभवनासमोर आंदोलन करतील !

पुरोगामी समाजात चुकीचा संदेश पसरवतात ! – ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे

काही जणांकडून पू. भिडेगुरुजी हे वारकरी संप्रदायाच्या विरोधात असल्याचे भासवले जाते. पुरोगामी, नास्तिकवाले समाजात चुकीचा संदेश पसरवण्यासाठी टपले आहेत. पुरोगाम्यांकडून पू. भिडेगुरुजी यांच्याविषयी वारकर्‍यांत अफवा पसरवल्या जात आहेत. पुरोगामी आणि धर्मद्रोही यांच्या अफवा आणि धमकी यांना भीक न घालता वारकरी संप्रदाय सदैव तुमच्या पाठीशी आहे, असे ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते यांनी आम्हाला सांगितले आहे.

गोवंश हत्याबंदी कायदा कृतीऐवजी केवळ कागदावर ! – ह.भ.प. अंभोरे महाराज (जालना)

भाषण करणे हा माझा स्वभाव नाही, तर संघर्ष करणे हा माझा स्वभाव आहे. गेली अनेक वर्षे गोवंश, गोरक्षा आणि गायरान भूमी रक्षण यासाठी माझा संघर्ष चालू आहे. या देशामध्ये गोवंशहत्याबंदी कायदा केवळ कागदावर आहे; मात्र तो कृतीत दिसत नाही. मी या सरकारला सांगू इच्छितो त्यांनी गोवंश रक्षणासाठी कटीबद्ध व्हायला हवे, कारण देवा-धर्माच्या नावावर हे सरकार निवडून आले आहे, याचा त्यांनी विचार करावा.

अनेक संकटे आली, तरी धर्माचा प्रसार करणे हे धर्मकर्तव्य समजून चालूच ठेवावे !  – प्रा. विठ्ठल जाधव, प्रवक्ते, सनातन संस्था

आज या देशात हिंदूंना सर्वात अधिक विरोध कोणाकडून असेल, तर तो स्वकियांकडूनच आहे. त्याचे कारण हिंदु धर्माचा द्वेष. त्यामुळे समाजात धर्मशिक्षण देणार्‍या आणि हिंदूंना संघटित करणार्‍या सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. त्याला वारकर्‍यांनी संघटितपणे विरोध केला पाहिजे. वारकरी सनातनच्या पाठीशी सदैव आहेत.

उद्या हिंदु राष्ट्रात या अधिवेशनाचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचे संघटक, हिंदु जनजागृती समिती

गेल्या १४ वर्षांपासून या अधिवेशनामुळे आपल्याला अनेक गोष्टींत यश मिळाले आहे. वारकर्‍यांच्या संघटित शक्तीमुळे अनेक कायदे झाले, नाटके आणि चित्रपट यांना विरोध होऊन त्याच्यावर कारवाई झाली. आज या धर्माच्या व्यासपिठावरून २०१९ ची नाही, तर २०२३ साली येणार्‍या हिंदु राष्ट्राची चर्चा झाली. उद्या हिंदु राष्ट्रात या अधिवेशनाचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.

सत्पुरुष, साधूसंत यांनी राजकारणात गेल्याविना देशाचा कायापालट अशक्य ! – ह.भ.प. देव गोपाळशास्त्री महाराज

आम्हाला दुसर्‍यांकडून काही घ्यायचे नाही; मात्र आमच्या मठ मंदिरांवर अतिक्रमण होणार असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. जोपर्यंत केंद्रात आणि राज्य सरकारमध्ये वारकरी संप्रदायातील व्यक्ती जात नाहीत, तोपर्यंत आपल्याला पर्याय नाही. सत्पुरुष, साधक, साधूसंत यांनी देशाच्या राजकारणात गेले पाहिजे, तेव्हाच देशाचा कायापालट होईल. आज आपली गोमाता संकटात आहे. गाय वाचली, तरच देश वाचेल. एकीकडे आपल्या हिंदु धर्मातील रूढी-परंपरांवर आक्षेप घेतला जात आहे, तर इतर धर्मियांना मोकळीक दिली जात आहे.

प्रत्येकाने नामजपाचे बल वाढवले पाहिजे ! – बालयोगी जय महाराज, पंढरपूर

आपण सर्व जण धर्मकार्यात पुढे जाऊन कार्य करू शकत नाही; मात्र जे या कार्यात सक्रिय आहेत, त्यांना आपण साधनेचे पाठबळ देऊ शकतो. त्यासाठी आपण प्रत्येकानेच नामजपाचे बल वाढवले पाहिजे. या धर्मकार्यातील लोकांमागे नामजपाची शक्ती आपण देऊ शकतो. आपल्या गावात होणार्‍या हरिपाठ पठण, कीर्तन अथवा इतर कार्यक्रमांची सांगता सामूहिक नामजपाने करावी. तसेच प्रत्येकाने प्रतिदिन अकरा माळा नामजप करावा.

हिंदुस्थानात हिंदूंवरच अन्याय केला जात आहे ! – ह.भ.प. केशव महाराज उखळीकर

जसे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आपले आदर्श आहेत, तसेच या अधिवेशनाचे अध्यक्ष ह.भ.प. वक्ते महाराज, पू. भिडेगुरुजी आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करतील. हिंदुस्थानात हिंदूंवरच अन्याय केला जात आहे. त्याच्या उलट इतर धर्मियांना काहीही बोलायला आणि करायला अनुमती आहे. हिंदूंमध्ये शक्ती नसल्याने ते मागे आहेत. हिंदूंनी एकमेकांमधील द्वेष संपवला पाहिजे. शेतकरी आणि वारकरी संघटित केल्यास हिंदू जगावर राज्य करू शकतो. छत्रपती शिवरायांना तुकोबारायांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली; मात्र आपल्या देशात काँग्रेसी नेत्यांची छायाचित्रे सर्वत्र पहायला मिळतात. सर्व ठिकाणी खरे माऊली, तुकोबाराय आणि श्रीकृष्ण यांची छायाचित्रे लावली पाहिजेत. प्रत्येकाने या अधिवेशनातील विचार घेऊन आपले घर, गाव, तालुका, जिल्हा आणि संपूर्ण परिसराची जागृती करून हिंदु धर्माच्या कार्यात सहभागी व्हायला हवे. त्यासाठी सर्वांना रामनामच तरून नेईल आणि राममंदिर झाल्याविना गप्प बसायचे नाही, असा निश्‍चय प्रत्येकाने करायला हवा.

हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी सर्वांनी संघटित व्हावे ! – ह.भ.प. मारुति महाराज तुनतुणे, महाधिवेशनाचे अध्यक्ष

वर्ष २००५ मध्ये काही ब्रिगेडी लोकांनी शिवधर्म नावाचा वेगळा धर्म स्थापन केला. त्यामधून गीता आणि ज्ञानेश्‍वरी जाळली पाहिजे, अशी वक्तव्ये केली. त्याला सर्व वारकरी संप्रदायाने कडाडून विरोध केला. यातूनच या महाअधिवेशनाला प्रारंभ झाला. हिंदु धर्मावर आपल्यातीलच लोक आघात करत आहेत आणि हे सर्व ब्रिगेडी लोक असून त्यांना आपण संघटित होऊन विरोध केला पाहिजे. यंदाच्या अधिवेशनाला पुष्कळ विरोध झाला; मात्र हे अधिवेशन झाले आणि यापुढेही होतच राहील. आपल्यातीलच काही महाराज मंडळी निधर्मीपणाचा चेहरा घेऊन फिरत आहेत. त्यांनाही धर्मशिक्षण दिले पाहिजे, कारण या देशातील जनतेचा सर्व गोष्टींवरून विश्‍वास उडाला आहे; मात्र महाराज मंडळींवरचा विश्‍वास अजूनही आहे. त्यांनी समाजाचा विश्‍वासघात करू नये. हिंदूंना धर्मशिक्षण नाही म्हणून ते बिघडले. मेकॉले शिक्षणपद्धतीने लहान मुलांवरचे संस्कार घालवले. त्यासाठी आता आपण हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी एकत्र यायला हवे.

मागासवर्गीय संघटनांकडून गालबोट लागून वारकर्‍यांना त्रास न होण्यासाठी पू. भिडेगुरुजी यांची अनुपस्थिती !

काही धर्मद्रोही संघटनांनी महाअधिवेशन उधळून लावण्याची धमकी दिल्यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याची सर्वत्र चर्चा रंगली होती. ‘मी कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्यास आळंदी येथे वारकरी संप्रदायांच्या कार्यक्रमांना मागासवर्गीय संघटनांकडून गालबोट लागून त्यांना त्रास होऊ नये’, याचा सर्वांगीण विचार करून पू. भिडेगुरुजी यांनी महाअधिवेशनाला न येण्याचा निर्णय घेतला होता, अशी चर्चा वारकरी संप्रदायात चालू होती.

पोलिसांकडून ‘चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार’ !

मागासवर्गीय संघटनांनी पू. भिडेगुरुजी यांच्या सत्काराला आक्षेप घेऊन महाअधिवेशन उधळून लावण्याची धमकी दिली होती. या धमकीप्रकरणी पोलिसांनी धमकी देणार्‍यांना अटक करून कारवाई करण्याऐवजी महाअधिवेशन घेणार्‍या आयोजकांना भारतीय दंड विधान संहिता १४९ कलमान्वये नोटीस पाठवून ‘चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार’ केला. पोलिसांच्या अशा वागण्याविषयी वारकर्‍यांत संताप व्यक्त केला जात होता.

महाअधिवेशनात प्रत्येक वक्त्यांनी दिलेल्या घोषणेमुळे वातावरण चैतन्यमय !

‘धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, गोहत्या बंद करो, गोमाता की जय, भारत माता की जय, विश्‍व का कल्याण हो, जय भवानी जय शिवाजी, हिंदु राष्ट्राचा विजय असो, हर हर महादेव’ अशा विविध घोषणा महाअधिवेशनातील सर्व मान्यवर आणि उपस्थित वारकरी यांनी दिल्या. इतर कार्यक्रमात एक-दोन जण घोषणा देतात; मात्र या महाअधिवेशनात प्रत्येक वक्त्यांनी उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्यामुळे संपूर्ण वातावरण  चैतन्यमय आणि उत्साही झाले होते.

ह.भ.प. केशव महाराज उखळीकर यांच्याकडून संजीव पुनाळेकर यांच्याविषयी गौरवोद्गार !

महाभारतात जसे संजय सर्व गोष्टींची माहिती धृतराष्ट्राला देत होता, तशी कायदा, विधी आणि न्याय विभागाची माहिती अधिवक्ता संजीव पुनाळेकर वारकर्‍यांना देण्यासाठी येथे आले आहेत, असे ह.भ.प. केशव महाराज उखळीकर यांनी अधिवक्ता पुनाळेकर यांच्याविषयी गौरवोद्गार काढले.

ह.भ.प. किशोर महाराज शिवणीकर, ह.भ.प. शुभम् महाराज वक्ते, ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे, ह.भ.प. निरंजन शास्त्री कोठेकर, ह.भ.प. बापू महाराज यांनी हे महाअधिवेशन यशस्वी होण्यासाठी अथक प्रयत्न केल्याविषयी त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

क्षणचित्रे

१. राष्ट्रीय वारकरी सेनेचे कोकण प्रांताध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर यांना भ्रमणभाष करून पू. भिडेगुरुजी यांनी महाअधिवेशनात सत्कार करण्याचा निर्णय घेतल्याविषयी मी या दोन्ही संघटनांचे आभार मानले, तसेच वारकर्‍यांना अडचण येऊ नये; म्हणून मला या महाअधिवेशनाला उपस्थित रहाता न आल्याविषयी त्यांनी खंत व्यक्त करून दिलगिरी व्यक्त केली. ‘पू. भिडेगुरुजींकडून हा आदर, नम्रता शिकली पाहिजे’, असे ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे यांनी म्हटले.

२. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. साध्या वेशातील पोलिसांची संख्या अधिक होती.


Multi Language |Offline reading | PDF