राममंदिराच्या सूत्रावर ओवैसींच्या साहाय्याने दंगली घडवण्याचा सरकारचा डाव ! – राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख

मुंबई – सरकारला हिंदु-मुसलमान दंगलींवर निवडणूक लढवायची आहे. यासाठी पुढच्या काही दिवसांत ओवैसीसारख्या लोकांशी संगनमत करून राममंदिराच्या सूत्रावरून दंगली घडवण्याचा डाव आखला आहे, अशी माहिती देहलीवरून दूरध्वनीच्या माध्यमातून समजली आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. विक्रोळी येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, वर्ष २०१९ च्या निवडणुकीनंतर राममंदिर निश्‍चित व्हायला पाहिजे; परंतु हिंदु-मुसलमान ध्रुवीकरण करून मते मागणे हा एककलमी कार्यक्रम सरकारने आखला असल्याने सतर्क रहाणे आवश्यक आहे.


Multi Language |Offline reading | PDF