देश ओवैसींच्या अब्बूंचा ?

संपादकीय

तेलंगण हे आंध्रप्रदेशपासून स्वतंत्र झालेले राज्य ! भाग्यनगर (हैद्राबाद) ही त्याची राजधानी. भाग्यनगरशी निजामाचा विखारी आणि अत्याचारी इतिहास जोडलेला आहे. आता निजामशाही नसली, तरी त्याचे बगलबच्चे तेथील वातावरण बिघडवत आहेत. एम्आयएम् पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचा भाऊ अकबरुद्दीन ओवैसी आता तेलंगणमध्ये निजामाचीच गादी चालवत आहेत. एम्आयएम्ची धर्मांध आणि हिंदुविरोधी भूमिका नवी नाही. ओवैसींच्या मनातील पराकोटीचा हिंदुद्वेषही नवीन नाही. सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडून केलेली अत्यंत विखारी वक्तव्ये ही अकबरुद्दीन ओवैसी यांची ओळख आहे. यापूर्वी त्यांनी हिंदूंना नष्ट करण्यासाठी १५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवण्याची भाषा केली होती. आता देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीच्या कानातून रक्त काढण्याची भाषा ते करत आहेत, तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची त्यांनी लायकी काढली आहे. वास्तविक निवडणूक जवळ आली की, अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जातात. ‘ते निवडणुकीसाठीच केलेले असतात’, हे लक्षात घेऊन एरव्ही कुणी त्याची नोंद घेत नाही. तेलंगण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मात्र ओवैसी विरुद्ध भाजप म्हणजेच हिंदू विरुद्ध मुसलमान अशी लढत आहे. योगी आदित्यनाथ यांनी प्रचाराच्या वेळी ‘भाजप सत्तेत आल्यास ओवैसीला निजामाप्रमाणे देश सोडून पळून जावे लागेल’, असे उद्गार काढले, तर ‘तुझ्यासारखे ५६ आले आणि गेले, आमच्या येणार्‍या १ सहस्र पिढ्या तुमच्याशी लढत रहातील. तुलाच पळवून लावू’, असे विखारी फूत्कार अकबरुद्दीन ओवैसी यांनी काढले आहेत. हिंदूंच्याच देशात राहून हिंदूंनाच अशी भाषा वापरण्याचे दुःसाहस ओवैसी करतात आणि १-२ नेते सोडले, तर बाकी राजकारणी हातावर हात ठेवून बसतात. काही ठराविक नेते सोडले, तर ओवैसी यांची ही असंसदीय भाषा इतर लोकप्रतिनिधींना ऐकू जात नाही का ? एरव्ही भाजपच्या प्रचारसभांमध्ये दिली जाणारी आश्‍वासने निवडणुकीनंतर हवेत विरून जात असतांना ‘भाजप सत्तास्थानी आला, तरी देशातून ओवैसी बंधूंना हाकलणार का’, याविषयी हिंदू साशंक आहेत; मात्र ‘अकबरुद्दीन ओवैसी यांच्यासारख्या विखारी आणि विद्वेषी विचारसरणीच्या लोकांनी भारतात राहू नये’, याविषयी हिंदूंचे स्पष्ट एकमत आहे.

कोण आले ? कोण गेले ?

एक ओवैसी म्हणतात, ‘‘देश आमच्या अब्बूंचा आहे.’’ एक म्हणतो, ‘‘आमच्या १ सहस्र पिढ्या येथे रहातील आणि तुमच्याशी लढतील.’’ हिंदूंचा देश ओवैसी बंधूंच्या अब्बूंचा कधी झाला ? या देशाला लाखो वर्षांची परंपरा आहे. १ सहस्र ४०० वर्षांपूर्वी इस्लामची स्थापना झाली. ओवैसींच्या अब्बूंच्या अब्बूंचा जरी विचार केला, तरी देश ओवैसींचा कधीच होऊ शकत नाही. भारतात मुसलमानांच्या रहाण्यावर कधीच कुणाचा आक्षेप नव्हता, तरीही आजची स्थिती पहाता हिंदूंना मुसलमानांशी फटकून वागणेच सोयीचे वाटते. याचे कारण अकबरुद्दीन ओवैसी यांच्या वक्तव्यात आहे. ओवैसी यांच्या मते ‘त्यांच्या १ सहस्र पिढ्या येथे केवळ रहाणार नाहीत, तर त्या ‘हिंदूंशी लढत रहातील !’ गेली १ सहस्र ४०० वर्षे ओवैसी यांच्या पूर्वजांनी तेच केले आहे; म्हणून आता निजामाप्रमाणे त्यांना पळवून लावण्याची आश्‍वासने देण्याची वेळ हिंदुत्वनिष्ठांवर आली आहे. ‘५६ आले आणि गेले’, असे म्हणणारे अकबरुद्दीन ओवैसी यांचा इतिहास कच्चा आहे. मुसलमान आक्रमक म्हणून आले आणि निजामाला ज्याप्रमाणे पळवून लावले, त्याप्रमाणे ते गेलेही. जे येथील संस्कृतीशी समरस होऊन राहिले, त्यांचा या देशाने यथोचित सन्मान केला आहे. मा. राष्ट्रपती अब्दुल कलाम हे त्या सन्माननीय व्यक्तींपैकी एक आहेत; मात्र जे सातत्याने येथे विद्वेष पसरवत आहेत, त्यांच्याविषयी मात्र या देशाला कोणतीही सहानुभूती नाही. ‘देशद्रोह करणार्‍यांना या देशात स्थान नाही’, हे सांगणारी पानेच्या पाने इतिहासात आढळतात. त्यातील निजामाचा जो इतिहास आता ओवैसी सांगत आहेत, तो त्यांनीच रचलेली मनघडण कहाणी आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर हैद्राबाद संस्थानावर सैनिकी कारवाई करून निजामाला हुसकवून लावण्यात आले, हाच सत्य इतिहास आहे. आता जाण्याचा पुढचा क्रमांक कुणाचा आहे, हे सर्वजण ओळखून आहेत. त्यामुळेच आता अस्तित्व टिकवण्यासाठी जमेल तेवढ्या खालच्या पातळीला जाऊन टीका-टिप्पणी चालू आहे. योगी आदित्यनाथ यांना पळवून लावण्याची भाषा करणार्‍या ओवैसींना वस्तूस्थितीचा विसर पडला आहे. १ सहस्र पिढ्या कुणी कुणाच्या पळवून लावल्या, हे जर पडताळून पाहिले, तर ओवैसी स्वतःही त्या मार्गाने जातील. हे जाणून  न घेता ओवैसी विखारी भाषणे देत प्रचार करत आहेत. अन्य राजकीय पक्षांच्या प्रचारसभांत विकासाची स्वप्ने दाखवली जातात. सुखसुविधा निर्माण करणे, भौतिक विकास करणे, इत्यादी करण्याचे किमान आश्‍वासन दिले जाते. एम्आयएम्ला हिंदूंच्या कानातून रक्त काढण्याची मर्दुमकी गाजवायची आहे. आतापर्यंत ओवैसींनी तेच केले; म्हणून आता त्यांना निजामाप्रमाणे हाकलण्याची योजना कुणी आखली, तर त्यात चूक ते काय, असे न रहावून वाटते.

विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राजकारण चालू असले, तरी त्याला काही सीमा असते. ती हद्द केवळ आताच नाही, तर यापूर्वीही वेळोवेळी पार करून ओवैसी बंधूंनी  स्वतःचीच पात्रता जगाला दाखवून दिली आहे. ओवैसी बंधूंना मते देणारे आणि प्रचारसभांना गर्दी करणारे कोणत्या योग्यतेचे आहेत, हेही यातून दिसून येते. सातत्याने केले जाणारे धर्मांध राजकारण, हिंदुद्वेष आणि फुटीरतावाद यांच्या राजकारणाला आणि त्यांना मते देणार्‍यांनाच आता हाकलून लावले, तर देशाचे भले होणार आहे !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now