बांगलादेशमध्ये धर्मांधांनी सरकारच्या साहाय्याने ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांना विस्थापित केले !

  • अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी भाजप सरकार याविषयी बांगलादेश सरकारकडे साधा शाब्दिक निषेधही नोंदवणार नाही, हे लक्षात घ्या !
  • केंद्रात साडेचार वर्षे सत्तेत असूनही भाजप सरकारने पाक आणि बांगलादेश येथील पीडित हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी काहीही पावले उचलली नाहीत, हे लक्षात घ्या ! अर्थात् जे सरकार भारतातील हिंदूंना न्याय मिळवून देऊ शकत नाही, ते पाक आणि बांगलादेश येथील पीडित हिंदूंना कधी न्याय मिळवून देऊ शकेल का ? यास्तव हिंदु राष्ट्रच हवे !  

ढाका – बांगलादेशमधील धर्मांधांनी तेथील इस्लामी सरकारच्या साहाय्याने ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ या संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष आणि त्यांचे कुटुंबीय यांची भूमी बलपूर्वक गिळंकृत करून त्यांना विस्थापित केले. ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ ही बांगलादेशमधील अल्पसंख्य हिंदूंच्या मानवाधिकारासाठी लढा देणारी संघटना आहे.

बांगलादेशचे अन्नपुरवठामंत्री अधिवक्ता काम्ररुल इस्लाम यांच्या साहाय्याने काही धर्मांधांनी ३० ऑक्टोबर २०१८ या दिवशी ढाका महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या अधिवक्ता घोष यांच्या भूमीचा बलपूर्वक ताबा घेत त्यांना तेथून विस्थापित केले. याविषयी अधिवक्ता घोष यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली; परंतु पोलिसांनी या तक्रारीची साधी नोंदही घेतली नाही. (बांगलादेशात सत्ताधारी पक्ष, पोलीस आणि प्रशासन तेथील हिंदु धर्मीय मानवाधिकार कार्यकर्त्याला असे छळत असेल, तर तेथील सामान्य हिंदूंचे काय हाल होत असतील, याचा विचारही न केलेला बरा ! – संपादक)

याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना अधिवक्ता घोष म्हणाले, ‘‘बांगलादेशमधील अल्पसंख्य हिंदूंच्या मानवी अधिकारांसाठी अधिवक्ता देत असलेला लढा थांबवण्यासाठी बांगलादेश सरकारने रचलेला हा कट आहे. माझ्या मालकीची भूमी ही सरकारी नाही, तसेच धर्मांधांचीही नाही. मी माझ्या भूमीवर बांधकाम केले आणि तेथेच रहाण्यास प्रारंभ केला. त्यासाठी मी ३० लाखांहून अधिक टका (बांगलादेशी चलन) रकमेचा व्यय केला; मात्र स्थानिक नगरसेवकांनी मला १० लाख टक्यांची रक्कम खंडणी म्हणून मागितली होती. त्यांना मी ही रक्कम न दिल्याने त्यांनी माझी भूमी गिळंकृत केली. या पूर्वीही अनेक वेळा धर्मांध आणि सरकारी अधिकारी यांनी माझ्यावर, तसेच आमच्या कार्यकर्त्यांवर आक्रमणे केली आहेत.’’


Multi Language |Offline reading | PDF