ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून होणार्‍या धर्मांतराविषयी स्थानिक लोकांशी चर्चा करीन आणि समितीच्या मागण्यांमध्ये लक्ष घालीन !

हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्‍वासन !

(डावीकडे) श्री. एकनाथ शिंदे यांना ‘सनातन पंचांग’ भेट देतांना समितीचे कार्यकर्ते

मुंबई, २ डिसेंबर (वार्ता.) – उल्हासनगर (जिल्हा ठाणे) येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात धर्मांतर चालू असल्याने धर्मांतरबंदी कायदा त्वरित करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी श्री. शिंदे यांनी ‘या प्रकरणी तेथील लोकांशी चर्चा करतो, तसेच समितीने केलेल्या मागण्यांचा विचार करून लक्ष घालतो’, असे आश्‍वासन दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट, अरविंद पानसरे उपस्थित होते. श्री. शिंदे यांना ‘वर्ष २०१९ चे सनातन पंचांग’ भेट देण्यात आले.

या वेळी श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘उल्हासनगर (जिल्हा ठाणे) येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून मोठ्या प्रमाणावर धर्मांतर चालू असून जवळजवळ १ लाखांहून अधिक सिंधी बांधवांचे धर्मांतर केल्याचे समोर आले आहे. शासनाने याची सखोल चौकशी करावी. राज्यातील शहरी तथा ग्रामीण भागांत गरीब, आदिवासी, पीडित लोकांचे फसवून आणि प्रलोभने दाखवून धर्मांतर केले जात आहे. गेल्या ५ वर्षांत राज्यात सहस्रो महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. या प्रकरणाच्या संदर्भात तत्कालीन काँग्रेस शासनाने नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी समितीने वर्ष २०१४ मध्ये मध्यप्रदेश आणि ओडिसा राज्यांच्या धर्तीवर धर्मांतरबंदी कायदा लागू करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाला केली आहे. त्याची कार्यवाही त्वरित करण्यासाठी शासनाने अध्यादेश काढावा.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now