पुणे येथील माहिती अधिकार सेवा समितीचे श्री. चंद्रकांत वारघडे विशेष वृक्षसंवर्धन सामाजिक पुरस्काराने सन्मानित

पुरस्कार स्वीकारतांना श्री. चंद्रकांत वारघडे (डावीकडून दुसरे)

लोणीकंद – सामाजिक कार्यकर्ते पै. श्री. सोहम् बाळासाहेब शिंदे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. चंद्रकांत वारघडे यांना विशेष वृक्षसंवर्धन सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. श्री. चंद्रकांत वारघडे यांनी स्वतः ध्यास घेऊन औषधी वनस्पतींसह अन्य वनस्पतींची शेकडोंच्या संख्येने लागवड केली आहे. या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रदीप कंद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अप्पासाहेब गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF