राममंदिर उभारण्यासाठी अध्यादेश न काढल्यास डिसेंबरमध्ये मंदिराचे बांधकाम चालू करू ! – विश्‍व हिंदु परिषदेची चेतावणी

विहिंपच्या विचारसरणीचे भाजप सरकार सत्तेत असतांना त्याला अशी चेतावणी का द्यावी लागते ? मंदिराच्या उभारणीसाठी विहिंप सरकारवर दबाव का आणत नाही ?

पालघर – अयोध्येत राममंदिरासाठी सरकारने तात्काळ अध्यादेश काढून भव्य मंदिराची उभारणी करावी, अन्यथा राममंदिराचे बांधकाम डिसेंबर २०१८ मध्ये चालू केले जाईल, अशी चेतावणी विश्‍व हिंदु परिषदेचे नेते मुकेश दुबे यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली.

विहिंपचे जिल्हा मंत्री सुशील शाह यांनी सांगितले की, देशभरात राममंदिराच्या उभारणीसाठी ५५० संकल्प सभा घेण्यात येत आहेत. खासदारांना राममंदिराच्या समर्थनार्थ उभे रहाण्यासाठी निवेदन दिले जात आहे.

बजरंग दलाचे जिल्हा संयोजक चंदन सिंह म्हणाले की, मंदिरप्रश्‍नी गावोगावचे कार्यकर्ते तरुणांमध्ये जागृती करत असून त्यांना कारसेवा करण्यासाठी सिद्ध रहाण्याचे आवाहन केले जाणार आहे. पालघरमध्ये होणार्‍या मंदिर निर्माण संकल्प सभेनिमित्त पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था वाढवली आहे. महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कुमक तैनात करण्यात आली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now