‘झी मराठी’वरील ‘तुला पहाते रे’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे चुकीचे चित्रण दाखवले आहे ! – प्रदीप नाईक, सामाजिक कार्यकर्ते

संस्कृतीहनन करणार्‍या मालिकांच्या प्रक्षेपणावर बंदीच घालायला हवी !

पुणे – ‘झी मराठी’वरील ‘तुला पहाते रे’ या मालिकेतून समाजप्रबोधन होत नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे चुकीचे आणि भयानक चित्र दाखवले जात आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केला आहे. मालिकेत २० वर्षीय तरुणीचे ४० वर्षे वयाच्या उद्योजकासमवेत प्रेमप्रकरण दाखवले आहे. प्रदीप नाईक यांनी पुणे जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘यातून माता-भगिनींना वेगळाच संदेश देण्याचा घाट निर्मात्यांनी घातला आहे. मालिकेला काहींनी विरोध दर्शवला असून मालिकेत पालट करावा किंवा मालिकेचे प्रक्षेपण बंद करावे.’


Multi Language |Offline reading | PDF